बहुतांशी कोणतेही फळ आपण खाल्ले तर आपण त्यातील बिया हा टाकूनच देतो. परंतु अशी काही फळे आहेत ज्यांच्या बिया आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात. काही फळांच्या बियांचा वापर आपल्या शरीरावर पौष्टिक घटक म्हणून सुद्धा केला जातो. तर चला मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास पपई च्या बियांचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही.
1) सर्दी पडसे पासून कायमची सुटका:-
पपईच्या बियांमध्ये पोलिफेनोल्स आणि फ्लेवोलोइड्ससारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स घटक असतात हे घटक शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात . ज्यामुळे शरीरामध्ये इन्फेक्शन चा धोका कमी होऊन वायरल इन्फेक्शन सारख्या आजारापासून आपला बचाव होतो.
शरीरातील कोले्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत:-
पपईच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड्स असतात त्यामुळे ते आपल्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं. जेव्हा तुमच्या धमण्यांमध्ये प्लाक कमी तयार होतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं. अशा तुम्ही हार्ट अटॅक, कोरोनरी ऑर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसेल्स डिजीजसारख्या हृदयरोगांपासून वाचू शकता.
3) वजन होईल कमी
पपईच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे पचना संबंधित असलेले आजार नाहीसे होतात जर पचनतंत्र चांगलं राहिलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार नाहीत आणि वाढणारं वजनही कमी होईल.
कसं करावं या बियांचं सेवन?
आता प्रश्न हा आहे की, पपई बियांचं सेवन कसं करावं? त्यासाठी या बीया स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्या, नंतर त्या कडल उन्हात वाळत घालाव्या. नंतर त्या बियांची पावडर तयार करावी ही पावडर तुम्ही शेक, मिठाई ज्यूससोबत प्राशन करू शकता. कारण याची टेस्ट कडवट असते. त्यामुळे गोड पदार्थासोबत याचं सेवन केलेलं ठीक असेल.
Share your comments