लसूण हा एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ आहे, याचा वापर मसाल्याव्यतिरिक्त विविध आजारात देखील केला जातो. लसूणचा वापर हा जवळपास प्रत्येक भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. हिवाळ्यात लसूण खाने शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. लसूण मध्ये ऍलिसिन नामक घटक असतो जो अनेक आजारापासुन आपल्याला संरक्षण देतो.
लसणामध्ये असलेले ऑर्गेनिक सल्फर कंपाऊंड एलिसिन लसणाचा तिखटपणा आणते आणि हाच घटक आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.
अलीकडे, लसणाच्या एका प्राचीन जातीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. जगभरात या लसणाचा स्वयंपाकात वापर केला जात आहे. या लसणाला ब्लॅक लसूण अथवा काळे लसूण म्हणुन संबोधले जाते. इतर कोणत्याही औषधी वनस्पतीपेक्षा या लसणाचा आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदा मिळतो तसेच हा लसूण चवीला पण चांगला असल्याचे सांगितले जाते
पण आता प्रश्न असा पडतो की पांढरा लसूण आणि काळा लसूण यात नेमका फरक काय? आणि या दोघांपैकी कोणता लसूण सर्वात बेस्ट आहे. तुम्ही देखील या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या लेखात आज आपण पांढरा लसूण आणि काळा लसूण यात काय फरक आहे, तसेच या दोघांपैकी कोणता लसूण जास्त फायदेशीर आहे या गोष्टींची माहिती जाणुन घेणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया या लसनाविषयी.
काय आहे काळे लसूण
मित्रांनो काळे लसूण काही नवीन वनस्पती नाही आहे. हा लसूण पांढरे लसूणचे एक रूप किंवा जुन्या पांढऱ्या लसणाची एक नवीन स्वरूप/आवृत्ती आहे. ह्या लसणाचा सुगंध हा पांढऱ्या लसूणसारखा तीक्ष्ण नसतो. पण हा लसूण पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते.
ताजे कच्च्या लसूणला उच्च तापमानात 60 ते 90 दिवस आंबविले जाते आणि त्यापासून काळा लसूण हा तयार केला जातो. काळे लसूण, हे नेहमीच्या लसणापेक्षा वेगळे असते. काळा लसूण हा चवीला साध्या लसणापेक्षा कमी तिखट आणि आंबट असतो. हा काळा लसूण मेणासारखा चिकट असतो. काळा लसूण साध्या लसणापेक्षा चवीला वेगळा असतो आणि त्यामुळे अलीकडे हा लसूण सर्वाधिक लोकप्रिय बनला आहे. काळे लसूण हे आशिया खंडात जास्त वापरला जात आहे, विशेषतः जपान आणि दक्षिण कोरियामध्ये याचा वापर लक्षणीय आहे.
Share your comments