कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना आता जगभरात मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. सध्या तब्बल ७५ हुन अधिक देशात या आजाराचा प्रसार झाला आहे. भारतात सुद्धा मंकीपॉक्सचे ८ रुग्ण समोर आले आहेत यातील ५ रुग्ण केरळ मधील तर ३ दिल्ली मधील आहेत. यामुळे चिंतेत अजूनच भर पडली आहे. यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच एकाच मृत्यू झाला आहे.
यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मंकीपॉक्सच्या धोक्यापासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत नियम जारी केले आहेत. सर्वानी हे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये आता मंकीपॉक्स पासून बचावासाठी शारीरिक अंतर राखणे हा सोपा मार्ग आहे. ज्यांच्यात मंकीपॉक्सची लक्षणे दिसून येत आहेत त्यांच्यापासून दूर रहा.
तसेच तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तत्काळ तुम्ही तपासणी करून घ्या. कोरोना काळात साबण व सॅनिटायजर वापरण्याची सवय लावली होती त्याचे पालन करा. सध्या मास्कचा वापर करण्याबाबतची बंधने हटवण्यात आली आहेत. असे असताना मात्र तुम्ही काळजीसाठी ते वापरणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या आणि रोज हळदीचे दूध प्या.
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो दुधाचे उत्पादन वाढवण्याची सोपी पद्धत सापडली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
तसेच लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवणे टाळा. जागतिक आरोग्य संघटनेनेने सेक्स कमी करण्याचा सल्ला दिला होता. मंकीपॉक्स संदर्भातील माहितीसाठी अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा, याबाबतचे अपडेट आरोग्य मंत्रालयाच्या वतीने वारंवार जारी केले जातात त्यावर लक्ष ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत
तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल, निर्णय विरोधात जाण्याची शक्यता
एकही रुपया न गुंतवता सुरु करा कुक्कुटपालन, दरवर्षी मिळेल लाखोंचा नफा, वाचा सोप्पी पद्धत..
Share your comments