1. आरोग्य सल्ला

गाईचे खरवस कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त, इम्युनोग्लोब्युलिनमुळे वाढते प्रतिकारशक्ती

कोरोना रुग्णाला गाईचा चीक (खरवस) आहार म्हणून दिल्यास त्यातील इम्युनोग्लोब्युलिनमुळे रोग प्रतिकारशक्ती (पॅसीव इम्युनिटी) वाढण्यास मदत होते. पर्यायाने रुग्ण लवकर बरा होतो, असा दावा वैद्यकीय आहारातज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी केला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
गाईचे खरवस कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त

गाईचे खरवस कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त

कोरोना रुग्णाला गाईचा चीक (खरवस) आहार म्हणून दिल्यास त्यातील इम्युनोग्लोब्युलिनमुळे रोग प्रतिकारशक्ती (पॅसीव इम्युनिटी) वाढण्यास मदत होते. पर्यायाने रुग्ण लवकर बरा होतो, असा दावा वैद्यकीय आहारातज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी केला आहे.

‘जर्नल ऑफ रिसर्च इन मेडिकल ॲण्ड डेंटल सायन्सेस’ या शोधपत्रिकेत याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. डॉ. खारतोडे यांनी २०० रुग्णांवर केलेल्या तुलनात्मक अध्ययनातून ही बाब समोर आली. पुण्यातील विश्र्वराज रूग्णालयात दाखल कोरोनाबाधितांवर त्यांनी ही चाचणी केली. त्या म्हणाल्या,‘‘ज्या गटाला गाईच्या चिकाचे सप्लिमेंट दिलेले होते. त्यांच्यामध्ये लवकर बरे होण्याचे प्रमाण दिसून आले. त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस दुसरा ते तिसरा होता आणि जे कंट्रोल ग्रुपमध्ये होते, ज्यांना सप्लिमेंट दिले नव्हते, त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस सहावा ते आठवा होता.’’

 

कोणता चीक खावावे? :

गाईचा चीक शुद्ध स्वरूपात (खरवस) मिळत असेल, तर तो नक्की खावा किंवा त्यापासून बनविलेले सप्लिमेंट खावे. फक्त ते ‘फ्रोझन ड्राइड किंवा फ्रीझ ड्रायिंग’ या पद्धतीनुसार बनवलेले असले पाहिजे, म्हणजे त्यामधील इम्म्युनोग्लोब्युलिनचा नाश होत नाही. कोरोनासाठी हा उपचार नसून एक पोषक पूरक आहार आहे. प्रयोगादरम्यान ज्यांनी चीक खाल्ले त्या रुग्णांना बाहेरून मास्कद्वारे दिला जाणारा ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात आणि कमी दिवस लागला. याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर दिसून येत नाहीत, पण ज्यांना दुधाची अ‍ॅलर्जी असते त्यांनी मात्र हा चीक खाऊ नये. - डॉ. स्वाती खारतोडे, संशोधक व वैद्यकीय आहार तज्ज्ञ

 

चिकातील पौष्टिक द्रव्यांचा परिणाम

विषाणूंचा संसर्ग झाल्यावर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी तयार करते ,
लेखक - मनोहर पाटील
शेतकरी मित्र परिवार, जळगाव जिल्हा

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: cow milk useful for corona patients Published on: 27 April 2021, 07:07 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters