Corona Update : भारतासह जगभरात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगासह देशातील कोरोना (Corona) संसर्गाचा फैलाव अद्यापही सुरुच आहे. यामध्ये दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 38 रुग्णांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा: Rain Update: पुढील चार दिवस धोक्याचे; 'या' भागात रेड अलर्ट
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
हे ही वाचा: मोठी बातमी : "शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार राहा"; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण कोरोनो संक्रमित आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. यासह आतापर्यंत भारतात (India) कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे.
हे ही वाचा: Night Tips for Men's Health: विवाहित पुरुषांनी रात्री झोपेसोबतच करावे असे काम, वैवाहिक जीवन बहरेल
Share your comments