Corona Update : जगासह देशातील कोरोना (Corona) संसर्गाचा फैलाव अद्यापही सुरुच आहे. यामध्ये दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भारतासह जगभरात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे. पण वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचं कारण बनत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनारुग्ण सापडले आहेत.
हे ही वाचा: Corona Update : जगभरात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण; धक्कादायक आकडेवारी आली समोर..
16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 30 हजारांच्या पार गेली आहे. तर कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यानेही पाच लाख 25 हजारांचा आकडा पार केला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
हे ही वाचा: Night Tips for Men's Health: विवाहित पुरुषांनी रात्री झोपेसोबतच करावे असे काम, वैवाहिक जीवन बहरेल
दिलासादायक ! खाद्यतेल स्वस्त होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय
Share your comments