गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट कायम आहे. असे असताना काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत होती. यामुळे अनेक ठिकाणी मास्कची गरज नसल्याचे सरकारने जाहीर केले होते. आता मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. याठिकाणी कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे ही एक चिंतेची बाब आहे.
पंजाब सरकारने देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधने हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे दिल्ली सरकारने 15 ते 59 वयोगटातील लोकांना बूस्टर डोस फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे. यामुळे पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. अनेक ठिकाणी गर्दी वाढल्याने पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.
दिल्लीमध्ये आपल्या गाडीतून एकटे प्रवास करत असाल तर आपल्याला मास्क (Wearing Mask) घालणं आवश्यक नाही. मात्र दिल्ली (Delhi)मध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. परिस्थिती वाढत गेली तर यामध्ये अजून नियम लावले जातील. दिल्लीत बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे.
दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोनाचे 965 रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी एक हजारहून जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. यामुळे हा आकडा सध्या चिंता वाढवणारा आहे. दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
गरिबांचे कोल्डड्रिंक महागले! सर्वसामान्यांना दुष्काळात तेरावा महिना
राज्यात लोडशेडिंगवरून सरकारचे पितळ उघडे, विरोधकांनी धक्कादायक माहिती आणली समोर..
आता ना गावठी ना देशी, आता फुलांपासून थेट विदेशी, राज्य सरकारचा निर्णय..
Share your comments