संपूर्ण देश दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करत आहे. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. काही दिवसांपासून कोरोना कमी होत असताना आता तो पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) आदेश दिले आहेत.
यामुळे पुन्हा संकट नको असेल तर काळजी घ्यावी लागणार आहे. मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे. यामुळे प्रवास करताना तुम्ही हे नियम लक्षात ठेवा.
सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या दिवसाचा आलेख हा वाढत आहे. प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पन्नास खोके एकदम ओक्के! अधिवेशनात विरोधकांच्या घोषणेची राज्यात चर्चा..
सध्या अनेक सण जवळ आले आहेत. यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या समारंभाचं आयोजन करु नका, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढला तर अजूनच कडक नियम लागू होतील. यामुळे आताच काळजी घ्यावी लागणार आहे.
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
असे असले तरी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी
Nashik: नाशिकच्या शेतकऱ्याचा इस्राईल पॅटर्न! मत्स्यपालनातून होतेय लाखोंची कमाई..
मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट
Share your comments