1. आरोग्य

Health News: आवळ्यांच्या बियांचे सेवन केल्याने मानवी शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
amla seed benifits

amla seed benifits

आवळ्याचे सेवन (Amla consumption) मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अनेक आहार तज्ञ (Dietitian) आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आवळ्या मध्ये असलेले पोषक तत्व (Nutrients) मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात म्हणून अनेक लोक आवळ्याचे आपल्या आहारात समावेश करत असतात. आवळ्याचे सेवन तसं बघायला गेलं तर बारामाही केले तरी त्याच्यापासून आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात, मात्र याचे सेवन हिवाळ्यात केल्यास त्यापासून जास्त लाभ मिळत असतात. चवीला तुरट असणारा आवळा खाण्यासही स्वादिष्ट असतो तसेच यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) आढळतात जे की मानवी शरीरासाठी खूपच उपयोगी पडतात. नियमित आवळा खाल्ल्याने मानवाची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते.

तसेच याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र सुधारते (Improves digestive system) तसेच अनेक पोटा संबंधित विकार (Stomach related disorders) दूर होण्यास मदत होते. एवढेच नाही तर आवळ्यामध्ये असलेल्या गुणधर्म केसांना मजबूत बनवतात तसेच यामुळे त्वचा देखील चमकदार बनते. आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला नानाविध प्रकारचे फायदे (Various benefits to the body) मिळत असतात परंतु आपणास आवळ्याच्या बियांचे फायदे माहित आहेत का? आवळ्याच्या बियांचे सेवन केल्याने देखील आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात आज आपण गुणकारी आवळ्याच्या बियांचे फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो आवळ्याच्या बियामध्ये पोटॅशियम मॅग्नेशिअम व्हिटॅमिन फायबर कॅल्शियम कॅरोटीन आयरन यासारखे विविध पोषक तत्व आढळतात. हे सर्व पोषक तत्वे मानवी आरोग्यासाठी एखाद्या वरदानासारखे कार्य करत असते. आवळ्याच्या बिया (Amla seeds) अनेक आजारात रामबाण ठरत असतात. मित्रांनो जर आपण आवळ्याच्या बियांची पावडर (Amla seed powder) बनवून नियमित सेवन केले तर यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. त्यामुळे आज आपण आवळ्याच्या बिया चे सेवन केल्याने नेमके कोणकोणते लाभ आपल्या शरीराला मिळत असतात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आवळ्याच्या बियाचे फायदे (Benefits of Amla seeds)

त्वचे संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते

मित्रांनो जर आपणास खरूज, नायटा, खाज सुटणे, दाद इत्यादी त्वचे संबंधित समस्या असतील तर चिंता करू नका आवळ्याच्या बियांचे सेवन केल्याने आपणास या समस्येपासून निश्चितच आराम मिळू शकतो. याचे सेवन केल्याने या त्वचे संबंधित समस्यपासून आराम मिळतो तसेच यामुळे त्वचा चमकदार बनते. मित्रांनो आवळ्याच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व त्यात नारळाचे तेल मिक्स करून एक पेस्ट बनवून घ्या. आणि हे पेस्ट त्वचासंबंधित समस्या असलेल्या ठिकाणी लावा यामुळे आपणास त्वचे संबंधित समस्येपासून आराम मिळतो.

बद्धकोष्टता पासून आराम देते

ज्या व्यक्तींना बद्धकोष्टता असेल क्या व्यक्तींसाठी आवळ्याच्या बियांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बद्धकोष्टता असलेल्या व्यक्तींनी आवळ्याच्या बियांची पावडर बनवून गरम पाण्यात सेवन केले पाहिजे असे केल्यास बद्धकोष्टता सारखे विकार दूर होतात शिवाय यामुळे पाचन तंत्र सुधारते आणि अनेक पोटासंबंधी विकार दूर होण्यास मदत होते.

उचकी बंद होण्यास मदत करते

जर आपणास अचानक तीव्र उचकी येत असेल तर आपण आवळ्याच्या बियांची पावडर मधात सेवन करून या पासून लगेच आराम मिळवू शकता. आवळ्याचा बियांचे पावडर मधात सेवन केल्याने अवघ्या काही मिनिटात उचकी थांबते.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters