रताळे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासह कंदमूळे आणि फळे (Roots and fruits) खाणे हे देखील अधिक फायदेशीर मानले जातात. कारण ही फळे आतून शरीर उबदार ठेवतात.
ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. रताळ्याच्या सेवनामुळे आरोग्यालाही (Health) अनेक फायदे तर मिळतातच यासह रताळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. चरबी, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅलरीज आणि फायबर चे भरपूर प्रमाणात असते.
विशेष म्हणजे रताळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) देखील मजबूत राहते. यासह रताळ्यामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत होते. रताळ्याच्या सेवनाने असे आणखी बरेच फायदे आहेत. तुम्ही रताळे उकडून तसेच भाजून देखील खाऊ शकता.
Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
रताळ्याचे फायदे
1) मधुमेह नियंत्रणात
रताळे सेवन केल्याने आरोग्य तर चांगले राहतेच, त्यासोबत रताळ्याच्या सेवनाने मधुमेहही नियंत्रणात राहतो. रक्तातील साखर नियंत्रणात (Sugar under control) ठेवण्यासाठी रताळे उकडून त्याचे सेवन करा. याचा फायदा नक्की तुम्हाला जाणवेल
2) रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत
मुख्यता रताळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. जे रताळे दिसायला अगदी जांभळ्या रंगाचे असतात ते सर्वात जास्त आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Kisan Vikas Patra: किसान विकास पत्र योजनेतून शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल; वाचा सविस्तर
3) वजन कमी करण्यास मदत
रताळ्यामध्ये आढळणारे फायबर हे वजन कमी (lose weight) करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे वजन पेशी वाढू देत नाही. तसेच शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. एक वाटी भाजलेल्या रताळ्याचे सेवन केल्यास भूकही कमी लागते. त्यामुळे याच्या सेवनाने वजन कमी झाल्याची लक्षणे दिसतील.
4) हाय बीपीमध्ये आरामदायी
रताळेमध्ये आढळणारे पोटॅशियम बीपीची समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रताळे सेवन बीपी असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त मानले जाते. मात्र तरीही खबरदारी म्हणून एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
Tur Market Price: तूर उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; बाजारातील चित्र बदलले, मिळतोय 'हा' दर
Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा
Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर
Share your comments