शरीराच्या सर्वोत्कृष्ट आरोग्यासाठी फळे खूप फायदेशीर ठरत असतात. लोक आहारात वेगवेगळ्या फळांचा समावेश असतो त्यामध्ये अननस, फणस, आंबा, पेरू, चिक्कू, सफरचंद यांचा समावेश असतो. फळे आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच फळे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळे लोक फळ खाण्यास जास्त पसंती देतात.उन्हाळ्यात तुम्हाला तुमच वजन जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्हाला फणसाचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे. फणसाच्या गरांची भाजी सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ली जाते. जगभरात फणसापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आवडीने खाल्ले जातात
आपला आजारांपासून बचाव होतो:
उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो. शाकाहारी लोकांचा मांसाहार म्हणून पण फणसाला ओळखलं जातं. आरोग्यासाठी फणस खूप फायदेशीर ठरते. वातावरणात बदल किंवा ऋतूमध्ये बदल झाला की आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते. त्यामुळं फणस खाल्ल्यामुळे आपला आजारांपासून बचाव होतो. फणसामध्ये अनेक पोषक घटक आढळतात त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी यांच्यासह डाएट फायबर, पोटॅशियम,आयर्न, मॅग्नेशियम, झिंक आणि फॉस्फरस हे घटक सुद्धा आढळून येत असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
फणस सेवनाचे जबरदस्त फायदे:-
1) वजन कमी करण्यासाठी:- फणसा मध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असते परंतु फायबर भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत होते. त्याशिवाय फणसामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. याचा उपयोग वजन नियंत्रणात ठेवण्यात होतो.
2)हाडे मजबूत होतात:- फणसामध्ये कॅल्शियम चा मुबलक साठा असतो जो आपल्या शरीरातील हाडांसाठी फायदेशीर असतो. त्यामुळे फणसाचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात आणि दातांचे आरोग्य सुद्धा चांगले सुधारते.
3)झोपेसाठी गुणकारी:- ज्या लोकांना झोपेविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आहेत त्या लोकांनी फणसाचे सेवन करावे. कारण फणस खाल्ल्यामुळे एकदम शांत झोप।लागते शिवाय आपले डोके सुद्धा शांत राहण्यास मदत होते आणि मेंदूला आराम मिळतो.
4)डायबिटीज वर नियंत्रण:- मधुमेह म्हणजेच शुगर नियंत्रणात ठेवण्यामध्ये फणस अत्यंत फायदेशीर आहे. फणसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. फणसामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात त्यामुळं शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिन रिलीज करण्याचा वेग कमी होतो आणि आपल्या भुकेवर नियंत्रण राहते त्यामुळं शरीरातील शुगर नियंत्रणात राहते.फणसाचे अनेक असे उपयुक्त फायदे आहेत जे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत म्हणून शरीराच्या निरोगी आरोग्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी फळे खाणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे फळांचे सेवन नियमितपणे करावे.
Share your comments