सध्या देशात कोरोनाचं संकट पसरलं आहे. या कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला अधिक रोगप्रतिकारक शक्तीची गरज आहे. अनेक डॉक्टर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला देतात. आम्ही या लेखात याचविषयी सांगणार आहोत, ही रोगकारकशक्ती तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाक घरात जावे लागले.
मसाल्याचे पदार्थ मध्ये बऱ्याच प्रकारची औषधे आणि आरोग्यदायी गुण असतात. या सगळ्या मसाल्याच्या पदार्था पैकी लवंग दिसायला अगदी छोटासा असली तरी लवंगाचे आरोग्यदायक गुण हे फार आहेत. आपण या लेखात पाहू..
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरते. कारण लवंग सेवनाने इन्फेक्शनआणि सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच लवंग मध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट त्यामुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पोटाच्या समस्येवर गुणकारी
लवंगा तील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी दोन लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्यावे. असे रोज तीन वेळा केल्याने गॅस ची समस्या दूर होण्यास मदत होते. गॅस, छातीत होणारी जळजळ सारख्या समस्येवर गुणकारी आहे.
गर्भावस्थेत फायदेशीर
लवंगा मध्ये भरपूर प्रमाणात ऑंटी सेप्टीक गुण असतात. त्यामुळे मळमळ, उलटी सारखे वाटणे या समस्या व्हायला लागल्या तर लवंग चघळणे फायद्याचे असते. गर्भावस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ होते. यावर लवंगा सारखे दुसरे फायदेशीर औषध नाही.
चेहऱ्यावरील पिंपल्स होतात दूर
लवंगाचे तेलामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स पासून सटका होते, तसेच चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लवंगा चा लेप तुम्ही चेहऱ्यावर देखील लावू शकतात.
दातदुखीवर उपयुक्त
आज-काल टूथपेस्ट मध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात जर खूप जास्त प्रमाणात दुखत असतीलतर कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा दातदुखी तात्काळ दूर होते.
डायबिटीस वर लाभदायी
आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.
खोकल्यासाठी फायदेशीर
तोंडात दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंगाचा जर नियमित वापर केला तर या समस्येपासून सुटका मिळते. रोज सकाळ संध्याकाळ दोन-तीन लवंग जबरदस्त खोकला दूर होतो.
सायनस पासून सुटका
सायनस पासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायन असणाऱ्यांनी एक दो तीन चार चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इन्फेकशन दूर होईल व श्वास घेताना होणारा त्रास कमी होईल.
Share your comments