
citizens from masks after 736 days
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनामुळे अनेक नियम लागू करण्यात आले होते. आता मात्र राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता मोकळा श्वास घेता येणार आहे.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी मास्कबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सर्व कोरोना निर्बंध हटवण्याबरोबरच उद्यापासून मास्क वापरण्याची सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. यामुळे आता मास्क नसला तरी कारवाई होणार नाही.
ज्या नागरिकांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा असे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीमुळे तब्बल 736 दिवसांनी सर्वच नागरिकांची मास्कपासून मुक्ती झाली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारकडून जरी मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली असली तरी, तो वापरायचा की नाही हा निर्णय ऐच्छिक असल्याचे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र येणाऱ्या काळात हा निर्णय फायद्याचा की तोट्याचा ठरणार हे लवकरच समजेल.
Share your comments