1. आरोग्य सल्ला

Health Tips: सावधान! मंकीपॉक्सचा लहान मुलांना जास्त धोका; लक्षणे दिसल्यास घाबरू नका असे करा संरक्षण

Health Tips: जगात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते. अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडतच आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर त्याच्या अनेक नवीन विषाणूंनी तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. मंकीपॉक्स नावाच्या आजाराने जगात पुन्हा दहशत निर्माण केली आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
monkeypox

monkeypox

Health Tips: जगात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना (Corona) सारख्या महामारीने थैमान घातले होते. अजूनही कोरोनाचे रुग्ण (Corona patient) सापडतच आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनानंतर त्याच्या अनेक नवीन विषाणूंनी तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) नावाच्या आजाराने जगात पुन्हा दहशत निर्माण केली आहे.

कोरोनाच्या धोकादायक आणि भयावह टप्प्यानंतर आता मंकीपॉक्स नावाच्या विषाणूने लोकांची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याबाबत जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. अलीकडे, अनेक लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली आहेत.

काही अहवालांनुसार, आता मुले देखील मंकीपॉक्स विषाणूला बळी पडत आहेत. लहान मुले यामुळे व्हायरल होत आहेत. हात, पाय आणि तोंडाचे आजार म्हणजेच एचएफएमडी 1 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये होत आहे.

त्यामुळे अशी लक्षणे तुमच्या मुलांमध्ये दिसली तर घाबरण्याऐवजी शांत मनाने वागा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जाणून घ्या मंकीपॉक्सची लक्षणे, त्याचे प्रतिबंध आणि मुलांमध्ये लक्षणे दिल्यानंतर काय करावे.

Onion Price: कोणी पैसे देतं का पैसे! कांद्याच्या घसरलेल्या किमतीमुळे शेतकरी मेटाकुटीला...

मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय

मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox virus), एक वेगळा विषाणू संसर्ग, 1958 मध्ये माकडांमध्ये प्रथम आढळला. त्याची पहिली केस 1970 मध्ये मानवांमध्ये नोंदवली गेली. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एका माणसापासून इतर अनेकांना पसरतो. त्याचा संसर्ग साधारणपणे 14 ते 21 दिवसांपर्यंत असतो.

मंकीपॉक्सची लक्षणे

वारंवार उच्च ताप
पाठीच्या आणि शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना
त्वचेवर पुरळ
आळस
घसा खवखवणे
वारंवार खोकला

मुसळधार पावसातून वाचलेल्या सोयाबीनवर केवडा रोगाचा प्रादुर्भाव; असा करा बचाव

मुलांचे संरक्षण कसे करावे

1. संसर्गाचा संशय येताच प्रथम मुलाला वेगळे करा.
2. विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
3. मुलाला लोकांपासून शारीरिक अंतर ठेवण्यास शिकवा.
4. मुलांना नीट हात स्वच्छ न करता त्यांचा चेहरा, डोळे, नाक इत्यादींना स्पर्श करणे टाळायला शिकवा.
5. मुलांना पौष्टिक आहार घरीच द्या आणि त्यांना भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

महत्वाच्या बातम्या:
अरे वा, भारीच की! शेतकऱ्यांचे वाचणार पैसे, देशात लवकरच लाँन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
भारतात या वर्षी येणार मोठं संकट! प्रसिद्ध बाबा वेगांचे भाकीत, आजपर्यंतची भाकीत ठरलीत खरी

English Summary: Children are more at risk of monkeypox Published on: 30 August 2022, 01:39 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters