अंडे खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. नाहीतर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही अंड्यामध्ये आढळणारे धोकादायक जिवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. त्यामुळे आमलेट करणे किंवा अंडे करण्यापूर्वी अंडे व्यवस्थित तपासून घेणे कधीही चांगले असते.
आमलेट करण्यापूर्वी किंवा उकळण्यापूर्वी अंडी व्यवस्थित पाहून घेणे गरजेचे असते. कारण काही अंड्यामध्ये आढळणारे धोकादायक जिवाणू व्यक्तीला आजारी पाडू शकतात. हा जिवाणू अंड्यात हलका हिरवा आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. जर तुम्हाला अंड्याच्या पांढर्या भागा मध्ये काही बदल दिसला तर ते अजिबात खाण्याचीचूक करू नका. एका अभ्यासानुसार असे स्पष्ट होते की, जर तुम्हाला अंड्यात गुलाबी किंवा इंद्रधनुष्य रंग दिसला तर ते फेकून द्या. कारण या अंड्याला सूडोमोनास बॅक्टेरिया ची लागण होऊ शकते.
अंडे खराब असल्याची लक्षणे
खराब अंड्याचा आंबट,कडक किंवा फळां सारखा वास येतो.अशा अंड्याच्या जर्दीवरपांढरा आणि तंतुमय थरयेतो. जो नंतर हलका तपकिरी होतो. अंड्यांचा पांढरा रंग बदलणे नेहमीच अंडे खराब असल्याचे लक्षण असू शकत नाही.
तज्ञांचे म्हणणे आहे की, काही अंड्यामध्ये आढळणारे धोकादायक जिवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. म्हणून आम्लेट करण्यापूर्वी किंवा अंडे उकळण्यापूर्वी ते तपासणे चांगले असते.
Share your comments