प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे आहारावर आणि व्यायमावर अवलंबून असते. आजच्या काळात स्वस्थ आरोग्य खूप गरजेचे आहे. बदलत्या जीवशैलीनुसार आणि आहारानुसार आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. लोकांना वेगवगेळ्या रोगांची आणि आजारांची लागण होत आहे.जसे जसे लोकांचे जीवन समृध्द होईल तसे तसे लोकांना नवनवीन आजार जडू लागले आहेत यामधे शुगर बीपी दमा हृदयरोग मधुमेह रक्तदाब कॅन्सर या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे.
महिलांमधील वाढणार गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर चा धोका:-
कॅन्सर चे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत रक्ताचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, आतड्याचा कर्करोग, पोटाचा कॅन्सर असे अनेक प्रकार आहेत. आजपर्यंत कॅन्सर रुग्ण हा जास्त काळ जगू सुद्धा शकतो कारण बाजारात वेगवेगळी थेरपी तसेच औषधे सुद्धा आली आहेत.
सध्या स्त्रियांमध्ये कॅन्सर चे प्रमाण वाढताना दिसत आहे जास्त प्रमाणात स्त्रियांना कॅन्सर हा स्तनामध्ये आणि गर्भाशयाच्या मुखाला होत आहे. परंतु आता यावर सुद्धा उपचार निघाले आहेत. कॅन्सर होऊन सुद्धा आता व्यक्ती दीर्घकाळ जगू शकते. तसेच किमोथेरपी कॅन्सर वरील उपचारात खूप महत्वाची ठरत आहे.
हेही वाचा:-पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर आहे शरीरास खूप फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
अवघ्या 200 ते 400 रुपयांना मिळणार लस:-
गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्वदेशात प्रथमच बनविलेली सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रकारची लस येत्या काही महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. खास म्हणजे ही कर्करोगावर उपलब्ध होणारी लस अवघ्या 200 ते 400 रुपयांमध्ये सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे.
प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडेल असा लसीचा भाव आहे तसेच सर्व्हावॅक लस बनविण्यासाठीचे संशोधन व विकास प्रक्रिया आता पू्र्ण झाली आहे. ही घोषणा गुरुवारी एका कार्यक्रमात करण्यात आली होती. लवकरात लवकर ही लस बाजारात उपलब्ध होईल असे आवाहन सुद्धा दिले आहे.
हेही वाचा:-शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल करा कमी, दैनंदिन आहारात करा या पदार्थांचा समावेश.
सर्वेनुसार 2020 साली संपूर्ण जगामध्ये 6.4 लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. त्यामधील 50 टकके म्हणजे 3.42 लाख महिलांचा २०२० मध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने मृत्यू झालं तसेच आपल्या भारत देशामध्ये 1 लाख महिलांना दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि त्यामधील 40 हजार महिलांचा मृत्यू होत असते या मधे 15 ते 44 वयोगटातील महिलांचे प्रमाण जास्त आहे.
पहिल्या टप्प्यात 20 कोटी डोस तयार करणार:-
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर वरील निर्मित सर्व्हावॅक लसीचे पहिल्या टप्प्यात २० कोटी डोस तयार करण्याची योजना आहे. त्यानंतर ती स्वदेशात वापरून नंतर अन्य देशांमधे त्या लसीची निर्यात आणि विक्री होईल अशी ग्वाही केंद्रीय जैवतंत्रज्ञान खात्याचे सचिव राजेश गोखले यांनी दिली.
Share your comments