अन्नामध्ये नेहमी पौष्टिक आणि दर्जेदार (Nutritious and quality) आहार घेणे गरजेचे असते. जेवण करण्यापूर्वी आणि नंतर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित होते.
आपण पाहिले तर विशेषता फुलकोबी लोकांची एक आवडती भाजी असते, मात्र याच्या जास्त सेवनाने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फुलकोबीचं जास्त प्रमाणात सेवन करणं नुकसानकारकही ठरू शकतं.
ग्रेटर नोएडातील GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत डायटिशिअन डॉ. आयुषी यादव यांनी फुलकोबी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
फुलकोबीमध्ये (Cauliflower) अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. असे असले तरी प्रत्येक गोष्टींचा फायदा तोटा असतोच. याचं जास्त सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. ते कसे याची माहिती घेऊया.
शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
थायरॉइड
थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. ज्या लोकांना थायरॉइडच्या (thyroid) समस्येचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी फुलकोबीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे टी-3 आणि टी-4 हार्मोनचं सिक्रिशन वाढू लागतं. जे आरोग्यासाठी चांगले नसते.
पोटात गॅस
फुलकोबीच्या जास्त सेवेनाने पोटात गॅस (Stomach gas) तयार होतो. विशेष म्हणजे फुलकोबीमध्ये रेफिनोज नावाचं तत्व असतं. जे एकप्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. याला आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने ब्रेक करू शकत नाही आणि हे छोट्या आतडीतून मोठ्या आतडीमध्ये पोहोचतं. ज्यामुळे पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होऊ लागतो.
दूध उत्पादकांना मोठा दिलासा; १ सप्टेंबर पासून दुधाच्या दरात ७ रुपयांनी होणार वाढ
रक्त घट्ट होते
फुलकोबीला पोटॅशिअमचा (Cauliflower potassium) रिच सोर्स मानले जाते. त्यामुळे जे लोक फुलकोबीचं जास्त सेवन करतात त्यांचं रक्त हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते. ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे. यामधील लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशात त्यांनी फुलकोबीचं सेवन करणं धोकादायक ठरू शकतं.
महत्वाच्या बातम्या
सरल पेन्शन योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन
लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी वापरा 'हे' तंत्र
Business Tips: 15 हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत होणार कमाई
Share your comments