आपल्या देशातील सर्वाधिक लोक आपल्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन करतात त्यासोबतच नाष्टा म्हंटले की सोबत आला पाव किंवा ब्रेड. भारत न्हवे तर संपूर्ण जगात लोक चहा आणि ब्रेड चे दिवाणे आहेत. ब्रेड हे एक फास्ट फूड आहे तसेच ऑफिस ला आणि कॉलेज ला जाणारे विदयार्थी याचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. परंतु तुम्हाला माहितेय का चहा आणि ब्रेड खाण आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते.
पचनक्रिया बिघडते:-
ब्रेड हे पॅकबंद पिशवीत असल्यामुळे त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स आणि अनेक घातक केमिकल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात.ब्रेड हे मैद्यापासून बनवले जातात त्यामुळे ब्रेड आपल्या पचनासाठी चांगले नसतात. ब्रेड आपल्या डायजेशन संस्थेला नुकसान करतात आणि आपल्याला पोटासबंधित तक्रारी जाणवू लागतात.
डायबिटीसमध्ये घातक:-
ज्या लोकांना शुगर चा त्रास आहे अश्या लोकांनी चहा आणि ब्रेड खाण टाळावं. कारण ब्रेड खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे ज्या लोकांना डायबेटिज सारखा आजार आहे त्या व्यक्तींनी ब्रेड चे सेवन करणे टाळावे.
हेही वाचा:-राज्यात शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू, वर्षाकाठी मिळणार 12 हजार रुपये.
हृदयासाठी हानिकारक:-
ब्रेड हे बंद डब्यात असल्यामुळे ते जास्त दिवस साठवून ठेवता येऊ शकतात. पदार्थ जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी त्यामध्ये काही केमिकल चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे केमिकल आपल्या शरीरासाठी आणि हृदयासाठी खूप घातक असतात. त्यामुळे ब्रेड चे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक चा धोका वाढतो.
हेही वाचा:-सरकारच्या या निर्णयामुळे तांदळाचे भाव राहणार स्थिर, मात्र सरकारला जास्त फायदा नाही
आतड्यांमध्ये फोड येतात:-
ब्रेड आणि चहा सकाळी खाल्ल्याने पोटातील आतड्यांना मोठे फोड येतात. ब्रेड पचनक्रियेसाठी नुकसानकारक आहे. त्यात ते जर चहासोबत खाल्ले तर अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. ज्यामुळे आतड्यांमध्ये फोड येऊ शकतात.
वजन वाढतं:-
ब्रेडमध्ये कार्ब, मीठ आणि रिफाइंड शुगर मोठ्या प्रमाणात असते . त्यामुळे तुम्ही जर रोज ब्रेड चे सेवन केले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे दैनंदिन आहारामध्ये ब्रेड खाणे टाळावे. जरी सेवन केले तरी ठीक आहे परंतु नियमित सेवन करू नये. नियमित ब्रेड खाल्ल्यामुळे शरीराला स्त्रोक चा धोका सुद्धा वाढतो.
Share your comments