आहारानुरूप दोन गटात विभागणी केली जाते एक म्हणजे शाकाहार करणारे आणि दुसरा म्हणजे मांसाहार करणारे हे आपल्याला माहिती आहेच.
जगातील अनेक डॉक्टर आणि तज्ञ शाकाहारी आहार चांगला असल्याचे समर्थन करतात. तज्ञांच्या मते, शाकाहार केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब सामान्य पातळीवर राहतो. एवढेच नाही तर टाइप 2 मधुमेह, हाय ब्लडप्रेशर आणि स्थूलपणा या सारख्या गंभीर आजारांना देखील शाकाहार दूर ठेवतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड पापुलेशन हेल्थ यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात दिसून आले की मांसाहार करणाऱ्या पेक्षा शाकाहारी लोकांना कॅन्सरचा धोका कमी असतो. यांनी केलेला अभ्यास बीएमसी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
कसा करण्यात आला हा अभ्यास?
यासाठी चार लाख 72 हजार लोकांचा संशोधनासाठी समावेश करण्यात आला. जे लोक मांस आणि मासे खातात त्यांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागले गेले. या सगळ्या लोकांचा 11.4 वर्षाचा डायट पॅटर्न फॉलो करण्यात आला. यामध्ये पहिला ग्रुप करण्यात आला त्यामध्ये जे लोक आठवड्यातून पाच किंवा अधिक वेळा मांसाहार खातात, अशा लोकांचा समावेश करण्यात आला. दुसर्या ग्रुपमध्ये जे आठवड्यातून पाच किंवा कमी दिवस नॉनव्हेज खायचे अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता.
तिसऱ्या ग्रुप मध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता जे फक्त मासे खाणारे होते आणि चौथ्या ग्रुप मध्ये शाकाहारी लोक ठेवण्यात आले होते. ज्यांनी कधीही मांसाहार सेवन केला नव्हता.
संशोधनाचे निष्कर्ष
यामध्ये शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, जे लोक नियमित मांसाहार करतात त्यांच्या तुलनेमध्ये कमी मांसाहार करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका दोन टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले. मासे खाणाऱ्या मध्ये दहा टक्के कमी आणि शाकाहारी मध्ये चौदा टक्के कॅन्सरचा धोका कमी असल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर जे लोक अगदी कमी प्रमाणात मांसाहार सेवन करतात अशांमध्ये कोलन कॅन्सर चा धोका ही नऊ टक्के कमी असल्याचे दिसून आले. मांसाहारी लोकांच्या तुलनेत नुसतेच आहारामध्ये माशांचा समावेश करतात अशा लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वीस टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले तर शाकाहारी लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका 31 टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले.
यावेळी इंडियन एक्सप्रेस शी बोलताना डॉ. आयान बसू यांनी सांगितले की शाकाहारी आहारामुळे कॉलेरेक्टल कॅन्सरचा धोका 22 टक्क्यांनी कमी होतो तसेच अशा लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका 10 ते 12 टक्क्यांनी कमी होतो त्यामुळे शाकाहार आरोग्यासाठी खूपच चांगला मानला जातो.( साभार- दिव्यमराठी)
Share your comments