सध्याच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकांना बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. माहितीनुसार आपण पाहिले तर गेल्या 25 वर्षात पुरुषांपैक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सर (Cancer in women) होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भारतातदेखील सर्वात जास्त कॅन्सर रुग्ण ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण आढळते.
गेल्या पंचवीस वर्षांत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. जगात तसेच भारतातदेखील सर्वात जास्त कॅन्सर रुग्ण ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) रोगाचे आढळतात.
स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३५ टक्के आहे. यात ३५ ते ६५ वयोगटामधील स्त्रियांची संख्या सर्वात जास्त आहे. केवळ पाच टक्के स्तनाचा कॅन्सर वयाच्या ३५ वर्षांपूर्वी आढळतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर याचे प्रमाण ८० टक्के आहे.
शेतकऱ्यांनो पीक नुकसानीबाबत माहिती भरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
मासिक पाळी कमी वयात येणे किंवा पन्नासीनंतरदेखील चालू राहणे, मूल नसणे, मुलाला दूध न पाजणे, लठ्ठपणा किंवा स्थूलपणा, व्यायाम न करणे, डायबेटीस (Diabetes), रक्तदाब इत्यादी त्रास असणे, इस्ट्रोजेन हॉर्मोनचे उपचार घेणे, लहान वयात रेडिएशन एक्सपोजर होणे इत्यादीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढते. तसेच साधारणपणे पाच ते आठ टक्के स्तनाचा कॅन्सर अनुवांशिक असू शकतो.
तुषार सिंचनाचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी; कमी जागेत मिळेल भरघोस उत्पादन
लक्षणे
स्तनाच्या आकारामध्ये बदल दिसणे, स्तनात गाठ होणे, स्तनाग्रातून रक्तस्राव होणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, काखेत गाठ येणे
ब्रेस्ट कॅन्सर असा टाळा
वय, लिंग, अनुवांशिकता, जिन्स म्युटेशन (Gene mutation), मासिक पाळी इत्यादी बाबी बदलणे जरी आपल्या हातात नसले, तरी आपण आपली जीवनशैली बदलून ब्रेस्ट कॅन्सर न होण्याची काळजी घेऊ शकतो. त्यासाठी खालील बाबी कराव्यात.
स्थूलता कमी करणे, नियमित व्यायाम करणे, स्मोकिंग किंवा अल्कोहोल न पिणे, मुले होऊ देणे, तसेच योग्य वेळेपर्यंत स्तनपान करणेजंक फूड न खाणे, रेडिएशन एक्सपोजर टाळणे.
महत्वाच्या बातम्या
सोयाबीनच्या दरात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
शेतकऱ्यांना 'हे' महत्वाचे तणनाशक फवारता येणार नाही; सरकारने घातली बंदी
'या' महिन्याचे शेवटचे दिवस तुमच्यासाठी कसे असतील? जाणून संपूर्ण राशीभविष्य
Share your comments