1. आरोग्य सल्ला

कारल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे; अपचन अन् डोकेदुखीवर आहे उपयोगी

शेतीमध्ये कधी कधी उत्पादन व उत्पादनखर्च याचा ताळमेळ बसत नाही. जर अशा परिस्थितीत कारले लागवडीचा प्रयोग राबविला तर दुष्काळी भागामध्ये कारले लागवड वरदान ठरू शकते. कोणत्याही हंगामात कारल्याची लागवड करता येते आणि कमीत- कमी जमिनीत कारल्याचे अधिक उत्पादन घेता येते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेतीमध्ये कधी कधी उत्पादन व उत्पादनखर्च याचा ताळमेळ बसत नाही. जर अशा परिस्थितीत कारले लागवडीचा प्रयोग राबविला तर दुष्काळी भागामध्ये कारले लागवड वरदान ठरू शकते. कोणत्याही हंगामात कारल्याची लागवड करता येते आणि कमीत- कमी जमिनीत कारल्याचे अधिक उत्पादन घेता येते. उत्पादनासह कारल्याचा आपल्या आरोग्यासाठीही उपयोग होतो. अनेक विकारासाठी कारले उपयोगी आहे.
कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
  • दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
  • लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो.
  • काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा.
  • तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.
  • पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो.

अशा आरोग्यादायी कारल्यांची कशी कराल शेती -

कारले पिकासाठी जमीन - या पिकासाठी मध्यमभारी, पोयट्याची किंवा रेताड जमीनही उपयुक्त आहे.

हवामान - कारले पिकासाठी थंड व जास्त दमट हवामान जास्त मानवत नाही. अशा हवामानामुळे पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे उबदार हवामानात लागवड करणे फायदेशीर असते. वेलींची वाढ खुंटणे, परागकण तयार होणे, मादी फुलांवर सिंचन या महत्वाच्या प्रक्रियांवर थंड हवामानाचा प्रतिकूल परिणाम होतो. कारले पिकाच्या वाढीसाठी 24 ते 27 अंश तापमान फायदेशीर असते.

लागवडीची पद्धत –

जमिनीची चांगली नांगरणी करून घ्यावी, नांगरणीनंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करून घ्यावी. कुळयाचया पाळ्या देण्यापूर्वी 15 ते 20 टन योग्यप्रकारे मिसळून घ्यावे दोन ओळींमध्ये 2 ते 2.5 मीटर अंतर ठेवावे 50 सेमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात.
वेलींमधील अंतर 1 मीटर ठेवावे लागवडीच्या वेळेस जर नत्र, स्फुरद, पालाश हेक्टरी 50 किलो या प्रमाणात टाकावे. लावणी करतांना 1 मीटर अंतरावर 2 ते 3 बियांची टोकन पद्धतीने लावणी करावी कारले लागवडीच्या ताटी व मंडप या दोन पद्धती फायदेशीर आहेत. कारल्याचे वेल जर आपण जमिनीवर पसरू दिले तर पाणी देतांना फळे सडू शकतात किंवा वेल पिवळे पडू शकतात. वेलींमध्ये हवा खेळती राहत नाही, त्यामुळे उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मांडव पद्धत फायदेशीर ठरते.

English Summary: bitter gourd has health benefits, is useful on indigestion and headaches Published on: 05 August 2020, 12:41 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters