डाळिंबचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. यामध्ये असलेले पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतात. यामध्ये असलेले विटामिन्स आणि खनिजे आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची आणि खनिजांची कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे अनेक आहार तज्ञ आणि डॉक्टर्स डाळिंबाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ज्या प्रकारे डाळिंब आपल्या शरीरासाठी फायदेशीर सिद्ध होते त्या प्रकारे डाळिंबाच्या पानांचा देखील आपल्या शरीराला खूप फायदा होतो. डाळिंबच्या झाडांचे पाने आपल्या आरोग्याला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात, याचे सेवन केल्याने आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो.
तसे बघायला गेले तर डाळिंबाच्या झाडाचे प्रत्येक पार्ट औषधी गुणांनी परिपूर्ण असते. मग ते डाळिंबाचे फळ असो किंवा पाने असो. आज आपण डाळिंबाच्या पानांचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. डाळिंबाच्या पानांचे सेवन केल्याने कावीळ, जुलाब, पोटदुखी, अनिद्रा इत्यादी रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. असे सांगितलं जात की, डाळिंबच्या पानाचा काढा पिल्याने वजन कमी होते.
डाळिंबाच्या पानांचे सेवन केल्याने होणारे फायदे (Benefits Of Pomegranate Leaves)
- जर आपणासही अनिद्राचा त्रास असेल तर आपण डाळिंबाच्या पानाचा सेवन करून या समस्येपासून कायमचे मुक्त होऊ शकता. डाळिंबाच्या ताज्या पानांना वाटून पेस्ट तयार करून घ्यावी आणि या पेस्टला पाण्यात उकळून घ्यावे. हा तयार झालेला काढा रात्री झोपताना प्यावा. नेहमी या काढ्याचे सेवन केल्याने अनिद्राची समस्या दूर होईल व आपणास चांगली झोप लागेल.
- खोकल्यासाठी- जर कोणाला खोकल्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने डाळिंबाच्या पानांचा काढा बनवून पिला पाहिजे. या काढ्याचे दिवसातून दोनदा सेवन केल्याने खोकला बरा होतो. यासोबतच डाळिंबांच्या पानाचा काढा सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
- कान दुखत असल्यास- ज्या व्यक्तींना कान दुखी चा त्रास आहे त्या व्यक्तींनी डाळिंबाचे पानांची पेस्ट बनवून त्या पेस्टमध्ये तिळीचे किंवा मोहरीचे तेल टाकून, तयार झालेले द्रावण एक ते दोन थेंब दुखत असलेल्या कानात टाकावे. यामुळे कान दुखी बंद होते.
Share your comments