मित्रांनो तुम्हालाही आवडते ना गुळाचे सेवन करणे, बरोबर ना! आवडत नसेल तरी गुळाचे सेवन हे केलेच पाहिजे. गूळ हे आपल्या मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, याचा आपल्या आरोग्याला खूप मोठा फायदा होतो. गुळ आपणास अनेक आजारांपासून देखील वाचवू शकतो. हेल्थ एक्सपर्ट असे सांगतात की साखरेऐवजी गुळाचे जर सेवन केले तर याचा आपला शरीराला खूप चांगला फायदा मिळेल. गुळात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे की आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी पडतात. साधारणपणे गुळाचे सेवन हिवाळ्यात अधिक होताना दिसते आणि ती एक चांगली बाब देखील आहे.
गुळात आयरण,पोटॅशियम, सोडियम, साखर इत्यादी पोषकतत्वे आढळतात, जे की आपल्या शरीराला अनेक व्याधीपासून वाचवु शकते. गुळाचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते. आज आपण हिवाळ्यात नेमका कोणत्या वेळी गुळ खाल्ला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. हेल्थ एक्सपर्टच्या अनुसार, जर आपण रात्री झोपताना गुळाचे सेवन केले तर याचे आपल्या शरीराला खुप आश्चर्यकारक फायदे होतात, ते फायदे नेमके कोणते ते सविस्तर जाणून घेऊया.
रात्री झोपण्याआधी गुळ खाण्याचे जबरदस्त फायदे (The tremendous benefits of eating jaggery before going to bed at night)
- ऍनिमियामध्ये पडते उपयोगी
रात्री झोपण्याआधी गुळाचे सेवन केल्याने, ॲनिमियाचे समस्येपासून कायमचे निदान प्राप्त केले जाऊ शकते. जसं की आपण आधी बघितलं की गुळात आयरन चे प्रमाण हे अधिक असते, त्यामुळे गुळाचे सेवन करून ॲनिमिया पासून वाचले जाऊ शकते, कारण की ऍनिमिया हा आयरनच्या कमतरतेमुळे शरीरात निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी गुळाचे सेवन निश्चितच केले पाहिजे.
- रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते
गुळात आयरण हे मोठ्या प्रमाणात असते आणि आयरन हे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास कारगर सिद्ध होते. याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबपासून सुद्धा वाचले जाऊ शकते. गुळात आयरन व्यतिरिक्त पोटॅशियम आणि सोडियम हे देखील आढळते आणि हे घटक देखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
- त्वचेसाठी आहे गूळ रामबाण
रात्री झोपण्याआधी गुळाचे जर सेवन केले तर आपल्या शरीराला याचा फायदा हा होतोच शिवाय यामुळे आपल्या त्वचेला देखील खूप फायदा मिळतो. गुळात एंटीमाइक्रोबॉयल नावाचा घटक असतो हा घटक आपल्या त्वचेवरील डाग घालवण्यास मदत करतो तसेच जर त्वचेला सूज असेल तर सूज देखील यामुळे कमी होते.
Share your comments