मित्रांनो सकाळी आपण अंघोळ केल्यानंतर चहा पिणे पसंत करत असतो, असे अनेक चहाप्रेमी असतात जे आपल्या दिवसाची सुरवात चहा पिऊन करत असतात. पण चहा आपल्या आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतो, त्या ऐवजी जर आपण एक चमचा तूप सेवन केले तर आपल्या शरीराला यापासून अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. तूप सेवन करणे मानवी आरोग्यास खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, यामुळे मानवी आरोग्य अबाधित राहते तसेच सकाळी सकाळी अनशापोटी तुपाचे सेवन केल्यास केस आणि मानवी त्वचा सदृढ राहण्यास मदत होते. तुपात असणारे पोषक घटक मानवी आरोग्यास विशेष लाभप्रद सिद्ध होते.
आपण जेवणात तुपाचे सेवन करत असतो, यामुळे जेवण स्वादिष्ट बनते शिवाय त्याला रुचकर चव प्राप्त होते. संतुलित प्रमाणात जर तुपाचे सेवन केले गेले तरी यामुळे मानवी आरोग्याला आश्चर्यकारक फायदा होत असल्याचे सांगितले जाते. तुपात असणारे औषधी घटक मानवी आतड्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. तुपात ओमेगा 3 नामक फॅट्टी ऍसिड असते, याशिवाय यामध्ये असंख्य एंटीऑक्सीडेंट बघायला मिळतात यामुळे मानवी शरीरावर होत असलेल्या वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो. याव्यतिरिक्त देखिल तुपाचे अनेक आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीरास होतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया सकाळी सकाळी अनाशेपोटी एक चमचा तूप खाल्ल्याने मानवी शरीराला होणारे काही आश्चर्यकारक फायदे.
रिकाम्यापोटी तूप खाल्ल्याने होणारे फायदे
मानवी शरीराची पचनक्रिया सुधारते-असे सांगितले जाते की, मानवी शरीराची पचनक्रिया सुरळीत होत असेल तर अनेक रोग बारा हात लांबच राहत असतात, त्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आहार तज्ञांच्या मते तूप खाल्ल्याने मानवी शरीरात एक विशिष्ट ऍसिड तयार होते हे ऍसिड अन्न पचवण्यासाठी विशेष लाभप्रद सिद्ध होते.
मानवी त्वचेसाठी आहे रामबाण-सकाळी सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप सेवन केल्याने, मानवी त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. यामध्ये ओमेगा फॅट्टी नामक ऍसिड असते जे की मानवी त्वचेस विशेष फायदेशीर आहे. एवढेच नाही तर तूप खाल्ल्याने उतारवयात जी त्वचा कोरडी होत जाते, त्याच्या गतीला संथ करण्यास मदत होते. आहार तज्ञांच्या मते, अनाशेपोटी तूप खाल्ल्याने मानवी केसांची वाढ चांगली होते तसेच केसांचे आरोग्य सुदृढ राहते.
बद्धकोष्टता होत नाही-तुपाचे सेवन केल्यामुळे पाचन तंत्र सुधारते, तसेच यामुळे आतड्यांचे कार्य देखील सुलभ होते. म्हणून सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्याने बद्धकोष्टता सारख्या समस्या होत नाहीत.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Share your comments