1. आरोग्य सल्ला

तुम्हाला माहित आहेत का खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, नाहीत? तर मग जाणुन घ्या

नमस्कार मित्रांनो आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वाची आवश्यकता असते, त्यासाठी आपण अनेक अन्नपदार्थ सेवन करत असतो, फळांचे सेवन करत असतो, अनेक ड्रायफ्रूट्स चे सेवन करत असतो. आज आपण अशाच एका ड्रायफ्रुटसच्या सेवनाचे फायदे जाणून घेणार आहोत. आज आपण खजूर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. खजूर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते, याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारची पोषक तत्त्वे मिळत असतात, खजुरचे सेवन आपणास अनेक रोगापासून लढण्यास सक्षम करते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
date

date

नमस्कार मित्रांनो आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वाची आवश्यकता असते, त्यासाठी आपण अनेक अन्नपदार्थ सेवन करत असतो, फळांचे सेवन करत असतो, अनेक ड्रायफ्रूट्स चे सेवन करत असतो. आज आपण अशाच एका ड्रायफ्रुटसच्या सेवनाचे फायदे जाणून घेणार आहोत. आज आपण खजूर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. खजूर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते, याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारची पोषक तत्त्वे  मिळत असतात, खजुरचे सेवन आपणास अनेक रोगापासून लढण्यास सक्षम करते.

खजूर मध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात याला पोषक तत्वांची खान म्हणून देखील संबोधले जाते. खजूर मध्ये अनेक प्रकारची विटामिन्स प्रोटिन्स फायबर मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. या सर्व पोषक घटकांची आपल्या शरीराला गरज असते. म्हणून खजूर खाल्ल्याने आपले शरीर सुदृढ बनते. असे सांगितले जाते की खजूरची नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते शिवाय खजूर चे सेवन केल्याने अनेक रोगांच्या निदान कार्यात मदत होते. चला तर मग जाणून घेऊया खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

खजूर खाण्याचे फायदे

  • ॲनिमिया मध्ये उपयोगी पडते- डॉक्टर च्या मते, जेव्हा आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्स कमी होतात तेव्हा ऍनिमिया नामक आजार आपल्या शरीराला जडतो. खजूर मध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते, आणि आयरन आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करते तसेच रेड ब्लड सेल्स कमी देखील होऊ देत नाही. आयरन आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन ची मात्रा नियंत्रित ठेवण्यास मदत करते. म्हणून ज्या लोकांना ऍनिमिया नामक आजार असतो त्या लोकांनी खजुरचे नियमित सेवन करावे.
  • बद्धकोष्टता असलेल्या लोकांसाठी फायदेशीर- जर एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्टता असेल तर त्या व्यक्तीने खजूरची नियमित सेवन करावे असे सांगितले जाते. खजूर मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात, आणि फायबर आपले पचन तंत्र मजबूत करते, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. आपण खजूर चे डायरेक्ट सेवन न करता रात्री खजूर पाण्यात भिजवून ठेवावे व सकाळी ते भिजलेले खजूर खावे याने लवकर फरक पडतो. नाहीतर आपण सलग महिनाभर एका दिवसात सात खजूर या प्रमाणात खजूरचे सेवन करावे, यामुळे आपले पाचन तंत्र सुधारेलच शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो यामुळे कमी होईल.
  • शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते- जर आपण नियमित खजूरचे सेवन केले तर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. कारण की खजूर मध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर हे मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हे घटक आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  • डोळ्यांसाठी आहे फायदेशीर- जर आपण खजूरचे नियमित सेवन केले तर यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. खजूर मध्ये अनेक विटामिन्स आढळतात त्यापैकी एक विटामिन आहे विटामिन ए जे की आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामुळे आपली दृष्टी देखील वाढते.
  • Disclaimer:- सदर आर्टिकल मध्ये दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती प्रदान करते हा कुठलाही वैद्यकीय सल्ला नाहीय. अधिक माहितीसाठी अथवा सल्ल्यासाठी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांकडे जावे.
English Summary: benifits of eating dates daily Published on: 25 December 2021, 10:05 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters