आपण आपल्या आहारात कारल्याचा नेहमी समावेश करत असतो. कारले चवीला जरी कडवट असले तरी अनेक लोक याचे मोठ्या आवडीने सेवन करत असतात. कारल्याची चव जरी कडवट असले तरी त्याचे औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी खूपच उपयोगाचे असतात. असे सांगितले जाते की कारल्याचे सेवन करणारे लोक कमी प्रमाणात आजारी पडतात. आहार तज्ञांच्या मते कारल्या मध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास विशेष कारगर सिद्ध होतात. कारल्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे याचा वापर अनेक औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो. आपण आपल्या आहारात कारल्याचे सेवन करत असतो मात्र असे असले तरी जर आपण कारल्याचा ज्युस नियमित सेवन केला तर आपल्याला यामुळे अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. कारल्याची भाजी खाण्यापेक्षा कारल्याचा ज्युस पिल्याने आपल्या शरीराला जास्त फायदा मिळतो.
कारल्याचा ज्युस पिल्याने मानवी शरीराला होणारे फायदे
खोकल्यासाठी ठरते रामबाण
ज्या व्यक्तींना नेहमीच खोकल्याचा त्रास असतो अशा व्यक्तींनी कारल्याचा ज्युस पिला पाहिजे, यामुळे खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कमीत कमी एक महिना दररोज एक ग्लास कारल्याचा ज्युस पिला पाहिजे. कारल्याचा ज्युस सेवन केल्याने जुनाट खोकला देखील बरा होण्यास मदत होते. कारल्यामध्ये फास्फोरस नामक औषधी घटक असल्याने याचे सेवन मानवी आरोग्याला फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जाते.
शरीरातील साखरेची प्रमाण कमी करण्यास मदत करते
डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कारल्याचा ज्युस सेवन केल्याने फायदा मिळत असतो. साखरेची समस्या असलेल्या व्यक्तीनी दररोज कारल्याच्या ज्युसमध्ये गाजरचा ज्यूस टाकून पिला पाहिजे यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते त्या व्यक्तीनी कारल्याचा ज्युस सेवन केला पाहिजे यामुळे हळूहळू रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कारल्यामध्ये मोमेरसिडीन आणि चारॅटिनसारखे अँटी-हायपरग्लायसेमिक घटक असतात म्हणून कारल्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर सिद्ध होत असते.
भूक वाढीसाठी करावे कारल्याचे सेवन
ज्या व्यक्तींना भूक लागत नाही तसेच कमी जेवण जाते त्या व्यक्तींनी कारल्याच्या ज्यूसचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो. शरीराला व्यवस्थित आहार मिळाला नाही तर अनेक आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे ज्या व्यक्तींना कमी भूक लागते त्यांनी कारल्याच्या ज्यूसचे सेवन करावे यामुळे भूक वाढीस मदत होते शिवाय पाचन तंत्र देखील सुधारते.
Disclaimer: Krishi Jagran Marathi या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची पुष्टी करत नाही. या फक्त सूचना म्हणून घ्या. असा कोणताही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.
Share your comments