तुम्हालाही काजू खायला आवडतो ना? प्रत्येकाला ड्रायफ्रुटसचे सेवन करणे आवडते, विशेषता काजु खायला खूप आवडतो. काजू चे सेवन केल्याने आपल्या शरीरास अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. काजू फक्त ड्रायफ्रुट्स म्हणूनच नाही उपयोगात आणला जात तर याची भाजी देखील बनवली जाते, तसेच अनेक पदार्थ बनवण्यासाठी काजू गार्निशिंग साठी वापरला जातो. काजूमध्ये असणारे अनेक पोषक घटक आपल्या शरीरास रोगांपासून लढण्यास सक्षम बनवतात. असे असले तरी काजूमुळे आपल्या शरीरास काही नुकसान देखील सहन करावे लागते. म्हणून आज आपण काजू पासून होणारे फायदे तसेच काजू पासून होणारे तोटे या दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया काजू चे फायदे आणि तोटे.
काजू खाण्याचे फायदे
- हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते
काजू हे आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवत असते. काजूचे नियमित सेवन केल्याने हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. काजूमध्ये बायो ऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट नावाचा घटक असतो, हा घटक आपले हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. म्हणून अनेक आहारतज्ञ काजूचे सेवन करण्याचा आपणास सल्ला देतात.
- कॅन्सर विरोधी
असे सांगितले जाते की काजूची नियमित सेवन केल्याने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारापासून वाचले जाऊ शकते. असे सांगितले जाते की काजूमध्ये एनाकार्डीक ऍसिड आढळते हा घटक आपल्या शरीरात कॅन्सरचा फैलाव होण्यापासून बचाव करते.
- गर्भवती महिलांसाठी उपयोगी
काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम राहते. काजूमध्ये कॅल्शियम असल्याने याचे सेवन केल्यास गर्भवती महिलांना याचा फायदा होतो तसेच येणाऱ्या बाळाला देखील याचा फायदा होतो बाळाची हाडे यामुळे मजबूत होतात.
काजू खाल्ल्याने होणारे नुकसान
- काजुमध्ये अधिक मात्रेत सोडियम आढळतो आणि म्हणून जर आपण प्रमाणापेक्षा जास्त काजूचे सेवन केले तर आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण हे अनावश्यक रित्या वाढू शकते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजार अशा समस्या होऊ शकतात.
- काजूमध्ये अधिक प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्या आपल्या शरीराचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतात.तसे बघायला गेले तर त्याला आपल्या शरीरासाठी चांगले असतात पण जास्त कॅलरीज आपल्या शरीराचे वजन वाढवु शकतात म्हणून काजूचे प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते.
- काजू मध्ये फायबर देखील आढळतो वास्तविक बघायला गेले तर फायबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो पण जर जास्त प्रमाणात फायबर शरीरात झाला तर त्यामुळे गॅसेसच्या समस्या तयार होतात आणि यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.
Share your comments