MFOI 2024 Road Show
  1. आरोग्य सल्ला

बीट खाण्याचे फायदे ; हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासह वाढवेल रक्त

बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे.

KJ Staff
KJ Staff


बीट हे थंड हवामानातील  पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते.  बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे.  बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  बीटमध्ये कॅल्शियम,  मॅग्नेशियम,  पोटॅशियम, फॉस्फरस,  विटामिन बी1,  बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते.  बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.  

    आहारात बीट खाण्याचे फायदे

  • रक्त वाढते- लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा.
  • बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते.  त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.

 

  • बीटचा रस प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते तसेच वजन वाढत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
  • कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. बीट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊन दात आणि हिरड्या मजबूत होतात.
  • बीटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फायबर असल्यामुळे त्यांचा रंग लाल आणि जांभळा असतो. शरीरामधील असलेला एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो.  बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो. बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्टता दूर करण्यासाठी मदत होते.  बद्धकोष्टता दूर करण्यासाठी औषध म्हणून बीटचा उपयोग होतो.
  • बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. बीटमध्ये असलेल्या नाइट्रेट घटकांमुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होण्यास मदत होते.

 

       
बीटमुळे कप होण्याची समस्या दूर होते.  त्यामुळे श्वसननलिका स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे करतो. बीडच्या रसामध्ये मध टाकून जर शरीरावर खाज येत असेल त्या जागेवर लावले तर होणाऱ्या खाज येण्याची समस्या दूर होते तसेच बीट मुळे सांधेदुखीचा त्रास ही भरपूर प्रमाणात कमी होतो. म्हणून आपण आहारामध्ये सुयोग्य प्रमाणात जर बीटचा वापर केला तर शरीरासाठी ते फार फायदेशीर ठरू शकते.

English Summary: Benefits of eating beets; Increased blood with keeping bones and teeth strong Published on: 11 August 2020, 08:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters