1. आरोग्य सल्ला

आरोग्य तंदुरुस्त आणि ठणठणीत ठेवण्यासाठी खा उकळलेली अंडी

अंडी आपल्याला माहितीच आहे की आपल्या स्वास्थ्यवर्धक गुणांमुळे लोकप्रिय आहे. ब्रेकफास्ट मध्ये अंडे खाने ही लोकांची पहिली पसंती असते. अंड्यामध्ये पौष्टिक तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व यामध्ये असतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
benefit of boil eggs

benefit of boil eggs

 अंडी आपल्याला माहितीच आहे की आपल्या स्वास्थ्यवर्धक गुणांमुळे लोकप्रिय आहे. ब्रेकफास्ट मध्ये अंडे खाने ही लोकांची पहिली पसंती असते. अंड्यामध्ये पौष्टिक तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व यामध्ये असतात.

. अंडे हे एनर्जी पोस्टर आहे यासोबतच वजन संतुलित ठेवण्यास मदत करते.  यामुळे ब्रेकफास्टमध्ये अंड्याच्या सेवन अवश्य करा. त्याच्यातच उकडलेली अंडी हे प्रथिने  आणि अमिनो ऍसिडचे प्रमाण जास्त असते. उकडलेली अंडी खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. प्रथिने आणि अमिनो ऍसिड या व्यतिरिक्त त्यात बरेच पौष्टिक घटक देखील असतात. जसे की विटॅमिन ए, विटामिन बी 12, विटामिन डी, विटामिन ई हे अंडी खाल्ल्याने आपल्याला मिळतात. म्हणून दररोज सकाळी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. या लेखात आपण उकडलेली अंडी खाण्याचे काही फायदे जाणून घेऊ.

  • अंड्यामध्ये ओमेगा 3 आणि विटामिन बी 12 हे घटक असतात. जे आपल्या मेंदूला अधिक काम करण्याची शक्ती देण्यासाठी उपयुक्त असतात. आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उकडलेली अंडी खाणे फायद्याचे आहे.
  • उकडलेल्या अंड्यामधील पिवळ्या बलकांमध्ये विटामिन डी असते जे हाडे मजबूत बनवते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.
  • तसेच अंडी खाल्ल्याचा फायदा हा स्नायू बळकट करण्यास देखील होतो अंड्यामध्ये आढळणारे प्रथिने स्नायूंना निरोगी बनतात आणि त्यांना बळकटपणा प्राप्त करून देतात. त्यामुळे सकाळी लवकर उठून दोन उकडलेली अंडी खाणे स्नायूंच्या बळकटपणा साठी फायदेशीर असतात.

 

  • डोळ्यांसाठी देखील उकडलेली अंडी खूपच फायदेशीर आहेत. ते आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतात. जर आपण नियमित अंडी खात असाल तर तुमचे डोळे चांगले राहतात.
  • 100 ग्रॅम अंड्यात सुमारे 155 कॅलरीज असतात. म्हणून हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत मानला जातो. हे आपल्या शरीरात त्वरित ऊर्जा देण्याचे कार्य करतात.
  • अंडी खाल्ल्याने केसांना देखील फायदा होतो. केसांची वाढ जलद होते आणि केस निरोगी राहतात. केस गळणे ही कमी होते त्यामुळे तुमच्या आहारात उकडलेल्या अंड्याचा समावेश करा.
  • अंड्यामध्ये कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फास्फोरस, सेलेनियम, विटामिन बी 5, विटामिन बी 12, विटामिन ई, विटामिन बी 6  यासारखे पोषक तत्व असतात. ते आपल्या शरीराला फारच फायदेशीर आहेत.

 

English Summary: benefits of boil eggs Published on: 09 July 2021, 07:37 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters