नवी मुंबई: प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचा भरपूर वापर केला जातो. टोमॅटोचा वापर भाजी आणि सॅलडसाठीही केला जातो. टोमॅटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होतो. त्यात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, ज्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक प्रामुख्याने असतात.
यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते. याचे रोज सेवन केल्यास डोळे निरोगी राहतात. मात्र असे असले तरी टोमॅटोचे चुकीचे सेवन तुमच्या शरीराला हानी देखील पोहोचवू शकतात. त्याचबरोबर असे काही आजार आहेत ज्याने ग्रसित असलेल्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये. चला तर मग जाणून घेऊया कोणते आजार आहेत जे असलेल्या रुग्णाने टोमॅटोचे सेवन करू नये.
पोटा संबंधित विकार असलेले
टोमॅटो खूप अम्लीय असतात आणि यामुळे याच्या सेवणाने जठराची सूज आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स सारख्या पोटाच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये आम्लता होऊ शकते. तुम्ही हेल्दी असला तरीही टोमॅटो जास्त खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी
टोमॅटोमुळे केवळ शरीरात कॅल्शियम जमा होत नाही तर ते ऑक्सलेट देखील भरपूर असते यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यावर सहज चयापचय होत नाही आणि त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. टोमॅटोमध्ये पोटॅशियम देखील भरपूर असते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. जर तुम्हाला आधीच किडनीचा त्रास असेल तर टोमॅटो खाताना काळजी घ्या.
टोमॅटोमुळे काही लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो
जास्त टोमॅटो खाल्ल्याने सांधेदुखी होऊ शकते कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कधर्मी पदार्थ असतो, ज्यामुळे ऊतींमध्ये कॅल्शियम जमा होते. जेव्हा खूप जास्त कॅल्शियम तयार होते, तेव्हा यामुळे सूज, वेदना आणि सांध्यांना देखील सूज येते.
Share your comments