मानवी जीवनात पैश्यापेक्षा सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे आरोग्य. निरोगी शरीर आणि पोषक आहार शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. नियमित व्यायाम करणे आणि योगासने यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहते. सध्या थंडीच्या दिवसात हृदय विकाराचा धोका जास्त ओढवत आहे यापासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी केल्याचं पाहिजेत.
हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचां धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसेच थंडीच्या दिवसात हार्ट अटॅक मुळे अनेक लोक आपले जीव गमवतात. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. हृदय विकार होण्याची अनेक कारणे आहेत आपल्या काही सवयीमुळे तसेच असंतुलित आहार यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो.
लो कॅलरी असलेला आहार:-
हार्ट अटॅक पासून तुम्हाला बचाव करायचं असेल तर आहारात लो कॅलरी असलेले पदार्थाचे सेवन करणे टाळावे. तसेच सोडियम असलेले पदार्थ सुद्धा खाणे टाळावे. या पदार्थामुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदरोगासोबत अनेक आजारांचा धोका वाढतो. तयामुळे शक्यतो या प्रकारचे आहार टाळावेत.
हेही वाचा:-राज्यात गाय आणि म्हशीच्या आढळल्या नवीन जाती, वाचा सविस्तर
प्लेटमध्ये भाज्या आणि फळांना जागा द्या:-
दररोज आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळे याचे सेवन करावे कारण यातून आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजं मिळतात भाज्या आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात व फायबर जास्त असतं. भाज्या, फळं आणि प्लांट फूड हृदयरोग रोखण्यास फायदेशीर असतात. त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, फळांचा सेवन करावे.
हेही वाचा:-कोकणातील फळराज्याला विमा योजना, जाणून घ्या सविस्तर नियम आणि अटी
कडधान्य:-
कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर चे प्रमाण आढळते तसेच या व्यतिरिक्त इतर पोषक घटक सुद्धा आपल्या शरीराला मिळतात. कडधान्याच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर आणि हृदयरोगांचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही प्रॉसेस्डच्या जागी डाएटमध्ये कडधान्याचा समावेश करा.
मीठ कमी खा:-
जर तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं. कारण जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. मिठाचं सेवन कमी प्रमाणात असावं तरच ते फायदेशीर असतं.
Share your comments