आपण जो काही आहार घेतो तो आहार आपल्या शरीराच्या विविध क्रियांवर परिणाम करत असतो. म्हणजे शरीराच्या बऱ्याच क्रिया या आहारावर अवलंबून असतात. आरोग्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील आरोग्यावर विपरीत परिणाम पडू शकतो.आरोग्य बिघडण्यासाठी जसे बाकीच्या गोष्टी कारणीभूत असतात तसे आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात.
अगदी पाणी पिण्याची पद्धत असो की रात्री तुमची झोपण्याची वेळ इत्यादी गोष्टींचा देखील आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. या लेखात आपण अशाच एका महत्वाच्या गोष्टी बद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच हे पदार्थ सोडाच
जेवण झाल्यानंतर 'या' गोष्टी टाळा
1- जेवणानंतर निकोटिनचे सेवन टाळा- बर्याच लोकांना जेवण झाल्यानंतर चहा किंवा सिगारेट, तंबाखू खायला आवडते. परंतु ही सवय आरोग्याला घातक असून जेवणानंतर त्यांचे सेवन केल्याने शरीरात निकोटीनचे प्रमाण वाढते व सिस्टोलिक स्तरावर परिणाम होतो.
2- जेवणानंतर आंघोळ-काही लोकांना जेवणानंतर आंघोळ करायची सवय असते. परंतु याबाबतीत जर आपण आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये सकाळची वेळ आंघोळीसाठी सर्वोत्तम मानली गेली आहे.
जेवण केल्यानंतर कधीही अंघोळ करू नका. जर तुम्ही असे केले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो व त्याचा विपरीत परिणाम पोटासंबंधी समस्या निर्माण होण्यावर होतो.
3- जेवणानंतर पाणी पिणे- बहुतांश लोकांना जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. आपण जर या सवयीचा विचार केला तर बहुतांशी लोकांना ही सवय असते.
परंतु जेवणानंतर लगेच पाणी पिले तर अन्नाचे पचन होण्यास अडथळे निर्माण होतात व ते नीट होत नाही, त्यामुळे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासात पाणी पिणे शरीरासाठी उत्तम आहे.
4- जेवणानंतर व्यायाम- जेवणानंतर जर व्यायाम केला तर त्याचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो व तुम्हाला उलट्या आणि पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
5- जेवणानंतर चहा- बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. तुम्ही जर असे केले तर यामध्ये असलेल्या निकोटीन या घटकामुळे शरीरातील प्रथिने शोषली जातात व आरबीसीची कमतरता शरीरामध्ये होऊ शकते.
6- जेवणानंतर लगेच झोपणे- जेवणानंतर झोपायची बऱ्याच लोकांना सवय असते. दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर ही सवय बऱ्याच जणांना असते. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याबाबतीत डॉक्टरांचा मताचा विचार केला तर त्यांच्यानुसार,
जेवण केल्यानंतर सुमारे दीड ते दोन तासांनी झोपणे कधीही फायद्याचे ठरते. पण तुम्ही जेवण झाल्यानंतर लगेच झोपाल तर तुम्हाला लठ्ठपणा, हृदयाच्या संबंधित समस्या व ऍसिडिटी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Share your comments