1. आरोग्य सल्ला

अश्वगंधा औषधी वनस्पती ; पांढऱ्या केसांच्या समस्यावर आहे उपयोगी

अश्वगंधा बहुगुणी वनस्पती आहे, आपण सगळ्यांनी याविषयी ऐकले असेलच. पण अश्वगंधा काय आहे, हे त्याचे गुण काय आहेत. अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे, विविध विकारांवर रामबाण उपाय म्हणून अश्वगंधाकडे पाहिले जाते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


अश्वगंधा बहुगुणी वनस्पती आहे, आपण सगळ्यांनी याविषयी ऐकले असेलच. पण अश्वगंधा काय आहे, हे त्याचे गुण काय आहेत. अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे, विविध विकारांवर रामबाण उपाय म्हणून अश्वगंधाकडे पाहिले जाते. सर्व रोगनाशक म्हणून जिनसेन च्या तोडीची वनस्पती म्हणून ती ओळखली जाते. ही वनस्पती अश्व शक्तीचे प्रतीक मानले जाते.  अश्वगंधाच्या सेवनाने डोक्याचे केस पांढरे होणे ही समस्याही दूर होते.  वेगवेगळ्या देशात अश्वगंधाचे विविध प्रकार आहेत. परंतु खरी अश्वगंधा ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, त्यावरुन तुम्ही खरी अश्वगंधा ओळखू शकता.  अश्वगंधाच्या मुळ्यांचा घोड्याच्या लिदे प्रमाणे गंध येतो. म्हणून दिला अश्वगंधा असे म्हणतात.

भारतात अश्वगंधा लागवडीसाठी मध्य प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, अकोला, पुणे, अहमदनगर,नाशिक या जिल्ह्यामध्ये अश्वगंधाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहेत.  रोपे काहीशी वांग्याच्या रोपासारखी दिसतात. झुडूप 50 ते 100 सेंटीमीटर वाढते. झाडांना वर्षभर पाणी मिळाली तर 3 ते 4 वर्ष वाढत राहते. झाडांची पाने हिरवी बारीक असतात अगदी वांग्याच्या छोट्या पानाप्रमाणे, फुले लहान, देठवीरहित, हिरवी असून पुष्पकोषने झाकलेली मोदकाच्या आकाराची व थोडी तांबडी असतात.  अशा गुणकारी वनस्पतीच्या औषधीगुणांविषयी आपण जाणून घेऊ.

.रोगविरहित वनस्पती

अश्वगंधा वर कोणत्याच प्रकारची कीड अथवा रोग येत नाही. त्याचप्रमाणे अश्वगंधाच्या झाडांना जनावरे खात नाहीत.  या पिकांवर फवारणीचा तसेच देखभालचा खर्च येत नाही. त्यामुळे या पिकाचा उत्पादन खर्च कमी होतो.

औषधी उपयोग

अश्वगंधा पुरुष प्रधान रोगावर गुणकारी असली तरी स्री रोगावरही तितकेच उपयुक्त आहे.  अश्वगंधाच्या मुळाची भुकटी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उत्तम प्रकारचे टॉनिक आहे.  मुळांमध्ये असलेल्या अल्कोलाईडमुळे अशक्तपणा,  नपुसकत्व नाहीसे होते.  तसेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्यास व पुरुषांमध्ये शुक्र पेशीच्या वाढीस मदत होते.  शूज, क्षय,कृमी, कुष्ठरोग त्वचारोग, आमवात, श्वेत प्रदर, कफ,वात, सांधेदुखी, रक्तविकार, या आजारावर मुळ्या उपयोगी आहेत. यांच्या पानांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते व प्रकृती सडसडीत आणि उत्साहवर्धक राहते.

सफेद केसांची समस्या होते दूर - to Stop Gray Hair Problem  - दोन ग्रॅम अश्वगंधा चुर्णाचे सेवन करावे. हे सेवन करण्याने केसांची समस्या दूर होते. 

डोळ्यांची रोशनी वाढवते – दोन ग्रॅम अश्वगंधा, दोन ग्रॅम आवळा आणि एक ग्रॅम मुलेठी एकत्र मिसळावे. त्याच चुर्ण बनवावे. एक चमचा अश्वगंधा चुर्णला सकाळी आणि सांयकाळी पाण्यासह सेवन करावे. यामुळे डोळ्याची  दृष्टी वाढते. असे अनेक आजारांवर अश्वगंधा उपयोगी आहे.  अश्वगंधाच्या मुळामध्ये 0.13 ते 0.30 अल्कोलाइड असून सोम नाईन, सोमनिफेईन,सुदोविथाईंन, निकोटीन हे रासायनिक घटक आहेत.

सुधारित वाण

विभागीय कृषी संशोधन केंद्र,मदसोर (जवाहरलाल नेहरु विद्यापीठ) यांची डब्ल्यू एस 20 तसेच केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था,लखनऊ यांनी पोशिता व निमित्त या जाती विकसित केलेल्या आहेत.

English Summary: Ashwagandha medicine plant : stop Gray Hair Problem Published on: 02 July 2020, 11:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters