आजच्या व्यस्त धकाधकीच्या आयुष्यात डोकेदुखी होन खूप सामान्य समस्या आहे पण जर डोकेदुखीची समस्या सतत जाणवत असेल तर आपण त्यास साधे समजू नका. तर योग्य वेळीच त्याकडे लक्ष द्या. अन्यथा समस्या वाढू शकते.
डीहायड्रेशन, शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा आवश्यक पोषक तत्वांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. पुरेशी झोप न घेणे हे देखील डोकेदुखीचे मुख्य कारण असू शकते. म्हणूनच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. आणि हेल्दी लाइफ स्टाइल फॉलो करा. डोकेदुखीची समस्या टाळण्यासाठी पेन किलरचा सतत वापर करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत. म्हणूनच पेन- किलरचा वापर टाळला पाहिजे.
फारच थोड्या लोकांना माहीत आहे की काही खास फेशियल व्यायाम डोकेदुखी पासून आराम मिळविण्यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. या काही खास व्यायामांच्या सहाय्याने आपण काही मिनिटात डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया अशा काही साध्यासुध्या फेशियल एक्सरसाइज टिप्स ज्यामुळे आपण काही मिनिटात डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतो.
1) तेलाने करा एक्सरसाइज :
डोळ्यांमध्ये किंवा सायनस मुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आपल्या दोन्ही हातांची तर्जनी लव्हेंडर तेलामध्ये बुडवा आणि डोळ्यात पासून सुरू झालेल्या नाकाच्या दोन्ही बाजूंच्या हाडांना हलक्या हाताने दाबा व चांगली मसाज करा. मसाज करताना हलक्या हातानेच करावी हे लक्षात असू द्या. डोकेदुखी मध्ये लव्हेंडर तेल वापरणे खूप फायदेशीर असते. लव्हेंडर तेलाने केलेली मालिश आपल्या डोळ्यांना विश्रांती देईल जेणेकरून आपल्याला डोकेदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.
2) भुवयांच्या मधोमध करा मसाज :
दुसऱ्या व्यायामासाठी आपल्या दोन्ही हातांच्या चारी बोटांच्या वरच्या भागास फेशियल ऑईल मध्ये बुडवा आणि त्या दोन्ही हातांच्या बोटांनी भुवयांच्या मध्ये एकसाथ हळुवारपणे मालिश करा. हे लक्षात ठेवा की मालिश हलक्या हाताने मीच केली पाहिजे, मालिश करताना जास्त दबाव देऊ नका. डोळे हलके बंद ठेवा आणि डोळ्यांवर कोणताही दबाव येणार नाही याची काळजी घ्या. व्यायामा दरम्यान एकदा दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स फिल करा. आपण हा मसाज 2 ते 3मिनिटांसाठी करू शकता. 2 ते 3 मिनिटांचा हा व्यायाम तुमची डोकेदुखी दूर पळवून लावेल.
3) तर्जनी चा वापर करून वेदना करा दूर :
तर्जनी बोट ज्याला आपण इंडेक्स फिंगर देखील म्हणतो, या बोटाचा उलटा यू आकार बनवा, त्यामध्ये फेशियल ऑईल लावा आणि दोन्ही बाजूंनी हळुवारपणे बोटं सरकवून कपाळाच्या वरच्या भागात भुवयांच्या वर मालिश करा. लक्षात ठेवा दबाव जास्त देऊ नका, अन्यथा बरे होण्याऐवजी वेदना आणखीनच वाढू शकतात.
4) दीर्घ श्वास घ्या :
तुम्हाला माहीत आहे का की दीर्घ श्वास घेतल्याने देखील डोकेदुखी पासून खूप आराम मिळतो. जेव्हा जेव्हा आपल्याला डोकेदुखी होईल तेव्हा तेव्हा एका जागी शांत बसा, आपले डोळे बंद करा आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्या. या व्यायामामुळे आपल्याला काही मिनिटातच आरामदायक वाटू लागले. तर मंडळी या काही सोप्या सोप्या टिप्स आहेत ज्याच्या सहाय्याने आपण डोकेदुखीपासून अगदी सहज मुक्ती मिळवू शकतो. जर आपल्याला डोकेदुखी असेल तर पेन किलर घेण्याऐवजी आपण सर्व या टिप्सचे पालन करून डोकेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता.
या सर्व व्यायामांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे कोणतेही नुकसान किंवा साइड इफेक्ट होत नाहीत आणि ते कधीही कोठेही केले जाऊ शकतात.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीचे कुठल्याही प्रकारचे समर्थन व्यक्तिगत किंवा कृषि जागरण समूह करीत नाही. कुठलाही उपचारकरण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:सावधान! 'या' लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये; नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' घातक परिणाम
नक्की वाचा:तेलाच्या गुळण्या केल्याने होतात जबरदस्त फायदे, जाणून घेऊ सविस्तर
नक्की वाचा:बाजारातुन विक्कत घेता त्यापेक्षा चांगला निंबोळी अर्क घरी बनवु शकतो
Share your comments