1. आरोग्य सल्ला

बदाम आणि खसखस दुधात टाकून पिल्याने मानवी शरीराला होतात अनेक फायदे, जाणुन घ्या याविषयी

आपण आपल्या आहारात नेहमीच दुधाचा समावेश करत असतो यामुळे आपल्या शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळत असतात. अनेक आहार तज्ञ देखील मानवी आहारात दुधाचा समावेश करण्याची शिफारस करत असतात. दुधात असलेले पोषक घटक मानवी शरीराला खूपच उपयोगी असल्याचे सांगितले जाते त्यामुळे याचे सेवन अवश्य केले पाहिजे. पण असे असले तरी अनेक लोकांना दुधाचे सेवन करणे आवडत नाही, जर आपणासही दुधाचे सेवन करणे पसंत नसेल तर आपण दुधात बदाम आणि खसखस मिसळून त्याचे सेवन करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
milk

milk

आपण आपल्या आहारात नेहमीच दुधाचा समावेश करत असतो यामुळे आपल्या शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळत असतात. अनेक आहार तज्ञ देखील मानवी आहारात दुधाचा समावेश करण्याची शिफारस करत असतात. दुधात असलेले पोषक घटक मानवी शरीराला खूपच उपयोगी असल्याचे सांगितले जाते त्यामुळे याचे सेवन अवश्य केले पाहिजे. पण असे असले तरी अनेक लोकांना दुधाचे सेवन करणे आवडत नाही, जर आपणासही दुधाचे सेवन करणे पसंत नसेल  तर आपण दुधात बदाम आणि खसखस मिसळून त्याचे सेवन करू शकता.

दुधात बदाम आणि खसखस मिक्स करून पिल्याने अनेक पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात. आहार तज्ञ सांगतात की, दुधात बदाम आणि खसखस  मिसळून पिल्याने त्यामुळे मानवी शरीराची हाडे मजबूत होतात. दुधात तसेच बदाम आणि खसखस मध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने यामुळे मानवी शरीराची हाडे मजबूत होतात तसेच यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील कमालीची वाढते. यामुळे फक्त हाडे मजबूत होतात असे नाही तर वजन देखील कमी होते तसेच यामुळे बद्धकोष्टता यासारख्या पोटाच्या समस्या देखील दूर केल्या जाऊ शकतात. चला तर मग मित्रांनोदुधात बदाम आणि खसखस टाकून पिल्याने होणारे फायदे जाणून घेऊया.

शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते

हिवाळ्यात मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होत असते. त्यामुळे हिवाळ्यात रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी दुधात बदाम आणि खसखस टाकून पिण्याची आहार तज्ञ शिफारस करत असतात. दूध बदाम आणि खसखस एकत्रितरीत्या सेवन केल्याने मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते आणि यामुळे मानवी शरीर अनेक रोगापासून लढण्यास सक्षम बनते.

वजन कमी करण्यास मदत करते

दूध बदाम आणि खसखस याचे एकत्रित सेवन केल्यानेवजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले पोषक घटक शरीरातील कॅलरीज कमी करण्यास मदत करतात त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात

दूध बदाम आणि खसखस याचे एकत्रित मिश्रण शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतात. दुधात केसर बदाम आणि खसखस मध्ये देखील पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानेहे मानवी शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आहारतज्ञ दुधात बदाम आणि खसखस टाकून सेवन करण्याचा सल्ला देतात.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: almonds and poppy mix into milk and see the benifits of it Published on: 07 January 2022, 02:38 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters