जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जायचे असले तरी तुम्हाला तुमचे मेडिकल रिपोर्ट सोबत घेण्याची गरज नाही. कारण तुमची सगळी मेडिकल हिस्ट्री या युनिक हेल्थ कार्ड मध्ये नोंदणी केली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन लॉन्च करू शकतात.आता ही योजना देशभरात सुरू केली जाणार आहे.
युनिक हेल्थ कार्ड कसे तयार होईल?
या योजनेची घोषणा होताच गुगल प्ले स्टोअर वर एन डी एच एम हेल्थ रेकॉर्ड उपलब्ध होईल. त्यावर नोंदणी करता येईल व युनिक आयडिया 14 अंकाचा असेल.
युनिक हेल्थ कार्ड चे फायदे
- युनिक हेल्थ कार्डमध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती डिजिटल फॉरमॅटमध्ये नोंदले जात राहील.
- आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलात तर आपले जुनी मेडिकल हिस्ट्री तिथेच फॉरमॅटमध्ये मिळेल.
- दुसऱ्या शहरातील हॉस्पिटल मध्ये गेलो तरी तेथे युनिक हेल्थ
कार्डद्वारे तुमचा डेटा पाहतायेईल.
- नवे रिपोर्ट प्राथमिक तपासण्या यामध्ये लागणारा वेळ आणि खर्च वाचेल.
या कार्डद्वारे सरकार प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी चा डेटा तयार करणार आहे. त्यानंतर एक आयडी सह संबंधित व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दाखल केला जाईल. या संबंधित आयडी द्वारे व्यक्तीचा मेडिकल रेकॉर्ड दिसेल.
एखाद्या डॉक्टरकडे एखादा पेशंट गेल्यास व त्याने आपले हेल्थ आयडी दाखवल्यास त्याद्वारे त्या रुग्णावर आधी कुठेही आणि कोणते उपचार झालेत, कोणत्या डॉक्टरचा सल्ला घेतला किंवा कोणती औषधे घेतली याची इत्थंभूत माहिती डॉक्टरांना समजेल. तसेच या कार्ड द्वारे संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती काय आहे याबाबत सरकारला डेटा बेस च्या आधारे माहिती मिळेल. त्या आधारे सरकार सबसिडी इत्यादींचा लाभ संबंधित रुग्णाला देऊ शकेल.
Share your comments