जर आपण गुंतवणूक योजनांचा विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या बऱ्याचशा योजना या एफडीवर बँकांपेक्षा जास्त व्याज देतात. पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच गुंतवणूक योजना परताव्याच्या बाबतीत खूप चांगले आहेत व या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे देखील आहे. या योजनांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील काही योजनांचे दर हे तीन महिन्यांनी सुधारित केले जातात. या तुलनेने बँकांच्या एफडीचे दर निश्चित आहेत.
पोस्टाचे व्याजदर जर तीन महिन्यांनी वाढत असतील तर नक्कीच पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून मिळणारा परतावा दर तीन महिन्यांनी वाढण्याची शक्यता अधिक आहे. या लेखामध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या तीन योजना पाहू ज्या बँकपेक्षा जास्त व्याजदर देतात.
पोस्ट ऑफिसच्या महत्त्वाच्या योजना
1-पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड- पोस्ट खात्याची ही योजना खूप फायद्याची असून या योजनेमध्ये व्याज उत्पन्न आणि योजनेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर जे काही व्याज मिळते ते करमुक्त आहे.
या योजनेमध्ये 7.1 टक्के व्याज वर्षातून एकदा दिले जाते. 18 पेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही गुंतवणूकदाराच्या नावे तुम्ही पब्लिक प्रोविडेंट फंड खाते उघडू शकतात.
नक्की वाचा:पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच रक्कम गुंतवा; दरवर्षी मिळणार 29 हजार रुपये व्याज
2- सीनियर सिटीजन सेविंग स्कीम- या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर या योजनेत वार्षिक 7.40 टक्के व्याज दिले जाते व महत्वाचे म्हणजे ते दर तीन महिन्यांनी दिली जाते.
या योजनेत वयाच्या 60 वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते अर्थात जॉइंट अकाउंट देखील उघडता येते.
3- सुकन्या समृद्धि अकाउंट- ही एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेत खाते उघडायचे असेल तर दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
ही योजना प्रामुख्याने मुलीसाठी आहे. या योजनेमध्ये वार्षिक 7.60 टक्के व्याज मिळते.या योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
Share your comments