समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना आखत असून त्याची अंमलबजावणी देखील केली जात आहे. मग ते कामगार असो किंवा शेतकरी किंवा इतर घटक या सगळ्यांसाठी चांगल्या योजना सरकारच्या माध्यमातून आणल्या जात आहेत. आता आपण विमा या बाबीचा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला विमा खरेदी करणे शक्य नाही. कारण बऱ्याच प्रकारच्या विमा पॉलिसींचे हप्ते हे खूप जास्त असल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोक अशा पॉलिसीज घेऊ शकत नाहीत.
त्यामुळे केंद्र सरकारने अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुरक्षित करण्याच्या हेतूने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक वीस रुपये खर्चात दोन लाख रुपयांचा कव्हर मिळणे शक्य आहे.
नक्की वाचा:Magnet Project: नेमका काय आहे मॅग्नेट प्रकल्प? शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा?
नेमकी काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?
जर आपण या योजनेचा विचार केला तर या योजनेच्या माध्यमातून संबंधित पॉलिसीधारकाला दोन लाख रुपयांचा अपघाती विमा म्हणजेच ॲक्सिडेंटल इन्शुरन्सचा फायदा मिळतो.
संबंधित पॉलिसी धारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला दोन लाख रुपये या माध्यमातून मिळतात व पॉलिसीधारक अपघातांमध्ये अपंग झाला तर त्याला एक लाख रुपयांचे विमा कव्हर दिली जाते.
या पॉलिसीचे स्वरूप
18 ते 70 वर्ष वयाच्या दरम्यान असलेली कुठलीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते. तुम्ही ही पॉलिसी घेतल्यानंतर ती एक जून ते 31 मे पर्यंत व्हॅलिड म्हणजे वैध राहते. तुमच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट पद्धतीने वीस रुपये कापले जातात व ऑटो रीन्यू या पद्धतीने पुढील वर्षासाठी पॉलिसी
रिन्यू केली जाते.
नक्की वाचा:LIC ची नवीन योजना लाँच; फक्त 5 हजार रुपयांमध्ये जबरदस्त फायदे आणि बोनसही
यामध्ये क्लेम कसा करावा?
समजा एखादा पॉलिसी धारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीचा किंवा पॉलिसीचा नॉमिनी बँकेत जाऊन यासाठी क्लेम करू शकतात.यासाठी संबंधित व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र,पोस्टमार्टम रिपोर्ट तसेच आधार कार्ड,स्वतःचे आधार कार्ड बँकेत जमा करणे गरजेचे आहे.
त्यासोबतच अपघातांमध्ये पॉलिसीधारकाला अपंगत्व आले तर संबंधित दवाखान्याची कागदपत्रे व आधार कार्ड बँकेत जमा करावे लागते व अपघातानंतर 30 दिवसाच्या आत तुम्ही पॉलिसीचा क्लेम करू शकता.
नक्की वाचा:LIC च्या सरल पेन्शन योजनेत मिळणार पाहिजे तेवढी पेन्शन; फक्त 'हे' एकच काम करावे लागणार
Share your comments