1. सरकारी योजना

Krushi Yojana 2022: बातमी कामाची! 'या' तीन योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी करतात मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य, वाचा डिटेल्स

भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे यांचा सगळा फोकस कृषी क्षेत्राच्या विकासाकडे आहे. शेतकऱ्यांना शेती करीत असताना बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो व त्यासाठी अनुदान स्वरूपामध्ये अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारे राबवत असतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
scheme for farmer

scheme for farmer

भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था आणि बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे यांचा सगळा फोकस कृषी क्षेत्राच्या विकासाकडे आहे. शेतकऱ्यांना शेती करीत असताना बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो  व त्यासाठी अनुदान स्वरूपामध्ये अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारे राबवत असतात.

परंतु बऱ्याचदा आपल्याला अशा योजनांची माहिती होत नाही त्यामुळे आपण या योजनांचा फायदा घेण्यापासून मुकतो.यामध्ये सरकार यांच्या सोबतीने अनेक सरकारी आणि खासगी संस्था देखील अनेक योजना राबवतात व शेतकरी बंधूंना कर्ज रूपाने आर्थिक मदतीसाठी कायमच पुढे सरसावतात.

शेतकरी बंधूंना माफक दरामध्ये कृषी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशाच महत्त्वपूर्ण तीन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Pm Kisan Update: शेतकरी बंधूंनो! तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता आला नसेल तर करा 'या' नंबरवर तक्रार, येतील खात्यात पैसे

 शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना

1- कृषी व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज- बरेच शेतकरी बंधूंना शेती करत असताना अनेक उद्योग किंवा व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून त्यासाठी नाबार्डकडून शेतकऱ्यांना वीस लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज आणि प्रशिक्षित कृषी स्टार्टअपसाठी एक कोटी रुपयांपर्यंतचे सामूहिक कर्ज देखील दिले जाते.

या योजनेच्या माध्यमातून कृषि व्यावसायिक किंवा उद्योजकांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 36 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे अशा व्यवसाय उभारणी जर झाले तर शेतकरी बंधूंचे शेतीवरील पूर्ण अवलंबित्व कमी होऊ शकते.

2- जमीन खरेदी योजना- आजही आपल्याला माहिती आहे की अनेक शेतकरी अल्पभूधारक किंवा ज्यांच्याकडे जमीन नाही अशी संख्या भरपूर आहे.

बरेच जण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. अशा अल्प भूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी जमीन खरेदी योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ गरीब, शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकरी यांना होतो. शेतकरी माफक दरात कर्ज घेऊन शेतीसाठी जमीन खरेदी करू शकतात.

नक्की वाचा:दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कोणती जमीन खरेदी करायची आहे याची माहिती द्यावी लागतेव त्या अनुषंगाने जमिनीची खरेदी किंमत मोजून 85 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेशी संपर्क साधू शकता.

3- सोने तारण योजना-कृषी सुवर्ण कर्जासाठी शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधू शकता. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमाल 50 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज उपलब्ध करून दिली जाते.

या कर्जासाठी शेतकऱ्यांची पात्रता किंवा शेतीच्या नोंदी तसेच इतर आवश्यक कागदपत्र तपासले जातात. त्यानंतर काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकरी बंधूंना कृषी सुवर्ण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ देशातील मोठ्या शेतकऱ्यांना जास्त होऊ शकतो.

नक्की वाचा:एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार

English Summary: this is three goverment scheme is so benificial for farmer and give financial support Published on: 19 October 2022, 04:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters