जर आपण विविध प्रकारच्या गुंतवणूक योजनांचा विचार केला तर यामध्ये एलआयसी आणि म्युचअल फंड सारख्या विविध गुंतवणूक पर्याय आहेत. यासोबतच पोस्ट ऑफिसच्या देखिल चांगला परतावा देणाऱ्या छोट्या बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करून जोखीममुक्त आणि उत्तम परतावा यामध्ये मिळतो. बँकेशिवाय पोस्ट ऑफिस मधून देखील ठेवलेल्या मुदत ठेवीचा लाभ मिळतो.
नक्की वाचा:घाई करा!'एसबीआय'ची 'ही' फायद्याची योजना 28 सप्टेंबरला होणार बंद, वाचा सविस्तर
कारण मुदत ठेवींमध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेमध्ये टर्म डिपॉझिट हा एक चांगला पर्याय ठरतो.
या योजनेत तुम्हाला एक,2,तीन आणि पाच वर्षापर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते वयामध्ये व्याजदर देखील वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे आहेत.
एक लाखाच्या गुंतवणुकीवर मिळतो एवढा परतावा
पोस्ट ऑफिस मध्ये पाच वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदर वार्षिक 6.7 टक्के आहे. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची ठेवीसह पाच वर्षाच्या मुदतीची मुदत ठेव उघडली तर पाच वर्षानंतर 6.7 टक्के वार्षिक व्याज दराने 1 लाख 39 हजार रुपये 407 रुपये मिळतात.
नक्की वाचा:Post Office Scheme : शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना; आता पैसे होणार डबल
त्यासोबतच एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदर वार्षिक 5.5 टक्के आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराचे किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे. परंतु दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते पालकांच्या देखरेखीखाली उघडता येते.
हे खाते कमीत कमी एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे उघडावे लागेल व यामध्ये जास्तीची गुंतवणूकिची कुठलीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कधी बंद केली जाऊ शकते. या टर्म डिपॉझिट योजनेमध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते व्याजदर सहा महिने ते बारा महिने पूर्ण होईपर्यंत लागू आहे.
नक्की वाचा:दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी
Share your comments