गुंतवणुक आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असून आपण केलेली बचत व त्या बचतीची व्यवस्थित गुंतवणूक यावर आपल्या सगळे जीवनाची मदार उभी असते. परंतु गुंतवणूक करताना बऱ्याचदा माणूस गोंधळात पडतो. केलेली गुंतवणूक सुरक्षित राहणे याला प्रथम प्राधान्य दिले जाते आणि दुसरे म्हणजे गुंतवणुकीच्या माध्यमातून जो काही परतावा येईल तो उत्तम मिळणे देखील अपेक्षित असते.
नक्की वाचा:LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्ष गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
यासाठी बरेच जण वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतात. म्युचल फंड्स, शेअर मार्केट तसेच एलआयसी यासारख्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
परंतु या बाबतीत पोस्ट खात्याच्या बचत योजना देखील तितक्याच सर्वोत्तम असून सुरक्षित व चांगले परतावा देणाऱ्या आहेत. या लेखात आपण अशाच उपयुक्त पोस्ट ऑफिसच्या काही योजनांची माहिती घेऊ.
पोस्ट ऑफिसच्या सर्वात्तम योजना
1- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट- ही योजना एक सर्वोत्तम असून एक मुदत ठेवी सारखी योजना आहे. या योजनेत तुम्ही एक ते पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. समजा तुम्ही एक ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला साडेपाच टक्के परतावा मिळतो.
नक्की वाचा:पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वृद्धांना मिळणार लाखों रुपये; घ्या आजच लाभ
परंतु तुम्हाला तर जास्तीचा परतावा पाहिजे असेल तर तुम्ही पाच वर्षाच्या एकरकमी ठेव योजनेत गुंतवणूक करणे गरजेचे आहे व या ठिकाणी तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही एक हजार रुपयांची गुंतवणूक करुन सुरुवात करू शकता.
2- आवर्ती ठेव योजना- समजा जर तुमचा प्लान सुरक्षित आवर्ती ठेवींमध्ये गुंतवणूक करायचा असेल तर तुम्ही या योजनेचा आधार घेऊ शकतात.
यामध्ये तुम्हाला पाच वर्षाच्या मॅच्युरिटी सह गुंतवणूक पर्यायावर 5.8 टक्के व्याज मिळते व या योजनेत फक्त शंभर रुपये दर महिन्याला गुंतवणूक करुन सुरुवात करू शकता.या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जास्तीची गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
नक्की वाचा:रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Share your comments