लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी एक गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असून एलआयसीने अनेक गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसे पाहायला गेले तर बाजारामध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट सारखे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत. परंतु एकंदरीत बऱ्याच जणांचा विचार केला तर गुंतवणुकीसाठी बरेच जण एलआयसीला प्राधान्य देतात. कारण गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या बाबतीत एलआयसी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे.
यामध्ये अनेक प्रकारच्या योजना असून उत्तम प्रकारच्या परतावा देण्याची क्षमता देखील या योजनांमध्ये आहे. एलआयसीकडून उपलब्ध असलेल्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये सुरक्षेसह विम्याचा लाभ देखील दिला जातो. एलआयसी चे काही पॉलिसी प्लॅन हे विमा बचतीसाठी देखील फायद्याचे ठरतात त्यामुळे एलआयसी मध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते. त्यामुळे अशाच एका महत्त्वाच्या प्लॅन बद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
एलआयसीचा रेग्युलर प्रीमियम युनिट लिंक्ड प्लॅन
एलआयसीचा हा प्लॅन खूप महत्त्वपूर्ण असून यामध्ये वार्षिक 40 हजार रुपये भरल्यानंतर 21 वर्षांनी जेव्हा पॉलिसीचा कालावधी संपतो तेव्हा तीन पट रक्कम या माध्यमातून गुंतवणूकदाराला मिळते. या प्लॅन सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स प्लॅन मध्ये गुंतवणूकदारांना 21 वर्षापर्यंत हप्ता भरावा लागतो. या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार हप्त्याचे शेड्युल घेऊ शकतात.
जसे की मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरण्याची सुविधा यामध्ये तुम्हाला मिळते. समजा तुम्ही 40 हजार रुपये वार्षिक प्रीमियम तर सहामाहीसाठी 22000 व तीन महिन्यांसाठी 12000 रुपये प्रीमियम भरायला लागतो. समजा तुम्हाला प्रतिमाह प्रीमियम भरायचा असेल तर तुम्ही महिन्याला चार हजार रुपये इतका प्रीमियम भरू शकतात.
या प्लॅनमध्ये कसा मिळवता येईल तीनपट फायदा?
यामध्ये एकवीस वर्षासाठी तुम्ही महिन्याला चार हजार रुपये हप्ता भरला तर तुमची दहा लाख 8 हजार रुपयांची गुंतवणूक होते व 21 वर्षांनी जेव्हा पॉलिसी संपते
तेव्हा तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेव्यतिरिक्त जवळपास 35 लाख रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजेच एकंदरीत विचार केला तर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम तीनपट जास्त आहे. तसेच या प्लॅनमध्ये गुंतवणूकदारांना चार लाख 80 हजार रुपयांचा इन्शुरन्स कव्हर देखील मिळते.यासाठीच्या अधिकच्या माहितीसाठी तुम्ही नजीकच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधू शकता व अधिकची माहिती घेऊ शकतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर..
Share your comments