शेतकऱ्यांना शेतीत काम करीत असताना बऱ्याचदा अनिष्ट प्रसंगांना सामोरे जावे लागते.त्यातल्या त्यात पावसाळ्यात प्रामुख्याने वीज पडणे,पुरात वाहून जाणे, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना बरेचदा सर्पदंश, विंचू चावणे तसेच इलेक्ट्रिक पंप चालू करताना विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवतात.
तसेच बरेचदा रस्ते अपघाताची भिती असते. कधीकधी बऱ्याचदा काहींना अपंगत्व येते. अशावेळी जर शेतकऱ्यावर असा काही तरी अनिष्ट प्रसंग ओढवला तर कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा अपघात झाल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बंद पडते व आर्थिकसमस्या निर्माण होतात.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना नंतर त्यांच्या कुटुंबांना लाभ दायक ठरेल अशी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे. या योजनेचे अगोदर चे नाव शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना असे होते व ती सन 2005-06 पासून सुरू करण्यात आली आहे.
सन 2009-10 पासून सदर योजनेचे नामाभिधान शेतकरी जनता अपघात विमा असे करण्यात आले.अगोदर या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा विमा संरक्षणसोबत राबवण्यात येत आहे.या योजनेचे नाव बदलून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे.
योजना 2015 पासून सुरू करण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचा विमा संरक्षणसह शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.
नक्की वाचा:अवघ्या पंधरा मिनिटांचा पाऊस; आणि वर्षभराची मेहनत पाण्यात
या योजनेच्या माध्यमातून अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी राज्यातील महसूल विभागाकडून सातबारावरील नोंदीप्रमाणे दहा ते 75 वर्षे वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांच्या कडून,योजनेचा मंजूर कालावधीकरिता,
प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे विमा पॉलिसी उतरविण्यात येत असून खालील प्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्यात येत आहे.
एकंदरीत योजनेचे स्वरुप
या योजनेच्या विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासांसाठी योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही तो या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे कुठल्याही प्रकारच्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
तसेच शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेने वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याच्या या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजने अंतर्गत मिळणारे लाभ हे स्वतंत्रपणे असतील.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..
विम्याचा दावा दाखल करताना आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, 6क, सहा ड ( फेरफार उतारा), एफ आय आर, पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट, दोषारोप, दावा अर्ज, वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक, घोषणापत्र व घोषणापत्र ब( अर्जदाराच्या फोटोसह), वयाचा दाखला,
तालुका कृषी अधिकारी पत्र, घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, वाहन चालवण्याचे लायसन्स, अपंगत्वाचा दाखला व फोटो, औषधोपचाराचे कागदपत्रआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अपघात नोंदणी 45 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
Share your comments