1. सरकारी योजना

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही एक योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दर 4 महिन्याला आर्थिक मदत देते. मात्र या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांबाबद मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

PM KISAN

PM KISAN

नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी शेतकऱ्यांना दिलासा देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही एक योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दर 4 महिन्याला आर्थिक मदत देते. मात्र या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांबाबद मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पीएम किसान योजनेचा आर्थिक लाभ योग्य लाभार्थ्यांच्या हातात जाण्यासाठी सरकारने या योजनेसंदर्भात काही महत्वाचे नियम आणि कायदे केले आहेत. या योजनेतून सरकार देशभरातील लाखो शेतकऱ्यांना लाभ देत आहे. मात्र या योजनेतील काही नियमानुसार ठराविक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. हे शेतकरी कोणते? व पीएम किसान योजनेसाठी अटी कोणत्या आहेत? पाहूया सविस्तर..

Rian Update: 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी! जाणून घ्या आजचा पावसाचा अंदाज

या लोकांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत

ज्यां शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा जास्त शेतीयोग्य जमीन आहे, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

यासह केंद्र/राज्य सरकारची मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय युनिट्स, केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संलग्न कार्यालये/स्वायत्त संस्थांचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी या योजनेचा लाभ घेतात. प्राप्त करण्यास पात्र नाहीत. असे देखील सरकारने सांगितले आहे.

New business idea: फक्त 60 रुपयांत 10 लिटर दूध बनवा, खर्च कमी, नफा जास्त

या शेतकऱ्यांना दिला जातोय लाभ -

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन आहे आणि त्यांची नावे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात आहेत, हे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी प्राप्त आहेत.

केंद्र सरकारकडून दर चार महिन्यांनी या शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. तीन हप्ते मिळून सरकारकडून वर्षभरात 6,000 रुपयांची मदत दिली जाते.

नादच खुळा! आजीने वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक; धैर्याला आणि आत्मविश्वासाला सलाम

English Summary: These farmers will not get the benefit of PM Kisan Yojana Published on: 12 July 2022, 02:54 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters