देशातील जनतेच्या कल्याणासाठी मायबाप शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना संपूर्ण देशात राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून देशातील जनतेत आर्थिक सहाय्य प्रदान करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना आहे.
ही योजना विशेषतः मुलींना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सुरू केली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पाल्यासाठी या योजनेत अडीचशे रुपये खर्च करून खाते खोलले तर त्या संबंधित व्यक्तीला 21 वर्षांनंतर तब्बल पंधरा लाख रुपये प्राप्त होतात.
मात्र यासाठी या योजनेत दर महिन्याला संबंधित व्यक्तीला तीन हजार रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजेच तीन हजार रुपये दरमहा गुंतवणूक करून या योजनेच्या माध्यमातून 21 वर्षांनंतर तब्बल पंधरा लाखांची बचत होणार किंवा संबंधित व्यक्तीला त्याचा फायदा होणार आहे. या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर 7.6 टक्के व्याजदर दिला जातो. निश्चितच ही योजना गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी मोठी फायद्याची ठरणारी आहे.
सुकन्या समृद्धी योजना ही अशा पालकांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्या पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला देखील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशाची उभारणी करायचे असेल तर आपण निश्चितच या योजनेचा एकदा विचार करू शकता.
तुम्ही या योजनेत रोजाना आठ ते दहा रुपये वाचवून किंवा गुंतवणूक करून आपल्या मुलींच्या भविष्यासाठी चांगला पैसा उभारू शकता. मित्रांनो या योजनेत मुलीच्या नावाने त्यांचे पालक खाते खोलू शकतात आणि त्यात गुंतवणूक करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत खाते खोलावे लागणार आहे. यासाठी आपण आपल्या जवळच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते खोलू शकता.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सुकन्या समृद्धी योजनेसाठी संबंधित व्यक्तीला आपल्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र लागणार आहे. याशिवाय मुलीचे ओळखपत्र, पालकांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि रहिवाशी दाखला किंवा तत्सम पुरावा, वीजबिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल द्यावे लागणार आहे.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी गुंतवणूक मर्यादा अडीचशे रुपये तर जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा दीड लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या योजनेत एका मुलीच्या नावाने एक खाते खोलले जाते. जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्यांना दोन्ही मुलींसाठी या योजनेत दोन खाते खोलावे लागतील. या योजनेवर कर सवलत दिली जातं आहे.
कसे मिळतील 15 लाख
या योजनेत एखाद्या व्यक्तीने दरमहा ३००० रुपये गुंतवल्यास. म्हणजेचं वार्षिक ३६,००० रुपये गुंतवणूक केल्यास त्या व्यक्तीला नंतर १४ वर्षांनी ७.६ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने, त्या व्यक्तीला ९ लाख ११ हजार ५७४ रुपये मिळतील. ही रक्कम २१ वर्षांच्या म्हणजेच योजनेच्या मॅच्युरिटीवर सुमारे १५ लाख २२ हजार २२१ रुपये असेल. म्हणजेच महिन्याकाठी तीन हजार रुपये गुंतवणूक करून या योजनेच्या माध्यमातून तब्बल पंधरा लाख रुपये संबंधित व्यक्तीला मिळणार आहेत.
Share your comments