तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च कसा निघेल याची काळजी वाटत असेल तर काळजी करू नका. आजची ही बातमी वाचा आणि तुमची काळजी कायमची मिटेल. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी पैसा वाचवायचा असेल तर आपण अगदी लहान बचत करून तिच्या भविष्यासाठी मोठी बचत करू शकता.
तुम्ही आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या शिक्षणासाठी छोटी बचत करून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. आज आम्ही आपणास अशा एका योजने बद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही अगदी छोटी गुंतवणूक करून 15 लाख रुपये जमा करू शकता.
मित्रांनो आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना आहे केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना तुमच्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करू शकते.
मोठी बातमी! आता शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 5 लाख अनुदान, वाचा सविस्तर
या योजनेत तुम्ही किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख प्रतिवर्षी जमा करू शकता. या योजनेत गुंतवलेल्या पैशावर करसवलतही आहे. या योजनेंतर्गत, मुलगी 10 वर्षांची झाल्यावर, त्यात पैसे जमा करण्यास सुरुवात करा आणि ती 21 वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेची रक्कम मिळेल. अशा प्रकारे तुम्ही कमी पैसे गुंतवून चांगली मोठी रक्कम जमा करू शकता.
तुम्हाला याप्रमाणे 15 लाख मिळतील:
सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवले तर ते वार्षिक 36000 रुपये होईल. त्यानुसार 14 वर्षांत 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये उपलब्ध होतील. 21 वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सुमारे 15,22,221 रुपये मिळतील.
Small Business Idea 2022: कमी पैशात सुरु करा 'हा' सोपा व्यवसाय, मिळणार बक्कळ पैसा; वाचा सविस्तर
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय पालकांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि ते कुठे राहतात याचा पुरावा पासपोर्ट, रेशनकार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल असे द्यावे लागणार आहे.
Share your comments