1. सरकारी योजना

Government Scheme : फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार

या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. आगामी काळात आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली आहे.

orchard planting scheme news

orchard planting scheme news

Agriculture Minister :

माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याबाबत शासन निर्णय देखील सरकारने जारी केला आहे.

फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. आगामी काळात आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने २०१८ साली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु करण्यात मान्यता दिली आहे. या योजनेत विविध १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता मजुरीसाठी देखील शेतकऱ्यांना वाढीव खर्च देण्यात येणार आहे.

दरम्यान, ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

English Summary: Subsidy for fertilizers will now be given instead of drip through orchard planting scheme Published on: 27 September 2023, 12:38 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters