1. सरकारी योजना

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ड्रॅगन फ्रुट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 'इतके' अनुदान

सध्या शेतकरी बंधू पारंपरिक पिकांच्या मागे न लागता व्यापारी दृष्टिकोनातून विविध आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. अनेक प्रकारचे विदेशी फळे व भाजीपाला लागवड भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर जर ड्रॅगन तुमचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती महाराष्ट्रामध्ये होऊ लागले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
subsidy on dragon fruit cultivation

subsidy on dragon fruit cultivation

सध्या शेतकरी बंधू पारंपरिक पिकांच्या मागे न लागता व्यापारी दृष्टिकोनातून विविध आधुनिक पिकांची लागवड करत आहेत. अनेक प्रकारचे विदेशी फळे व भाजीपाला लागवड  भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर जर ड्रॅगन तुमचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती महाराष्ट्रामध्ये होऊ लागले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ड्रॅगन फ्रुट शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर

 ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी मिळणारे अनुदान

 राज्य सरकारकडून एका हेक्‍टरवर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी चार लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून त्यापैकी 40 टक्के रक्कम म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने चार कोटी रुपयांची तरतूद केली असून महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात देखील केली आहे.

नक्की वाचा:Onion Farming : कांदा लागवड शेतकऱ्यांना बनवणार लखपती! मात्र 'या' गोष्टींची घ्यावी लागेल काळजी

हे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजेच 96 हजार रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे. 

यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक असून या अनुदानासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.त्यासाठी सदर शेतकऱ्याकडे पासपोर्ट फोटो, सातबारा तसेच 8अ चा उतारा, आधार लिंक असलेले बँक खाते, जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान

English Summary: state goverment give 1 lakh 60 thousand subsidy on dragon friut cultivation Published on: 27 September 2022, 09:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters