सरकार नेहमीच नागरीकांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. अशीच एक महत्वाची योजना सरकार महिलांसाठी राबवत आहे. महिलांचे सक्षमीकरण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये महिला गुंतवणूकदारांसाठी महिला सन्मान बचत सर्टिफिकेट (MSSC)या एकवेळ बचत योजनेची घोषणा केली. या योजनेत सर्व वयोगटातील महिला गुंतवणूक करु शकतात.
महिला सन्मान बचत योजना -
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत कोणतीही महिला 1 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकता. जर एखाद्या मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर पालकांच्या मदतीने पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते. योजनेअंतर्गत खाते उघडल्यास दोन वर्षात खात्याची मॅच्युरिटी होते. त्याचबरोबर गरज असल्यास एका वर्षानंतर या योजनेच्या खात्यातून ४० टक्के रक्कम काढता येते. या योजनेअंतर्गत नवीन आर्थिक वर्ष म्हणजे १ एप्रिलपासून कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.
केंद्र सरकारच्या वतीनं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के चक्रवाढ व्याज तिमाही दरानं मिळणार आहे. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
पॅन कार्ड
केवायसी कागदपत्रे
पासपोर्ट फोटो
Share your comments