पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांना देण्यात येतात. या योजनेचा फायदा जवळजवळ देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे.
नुकताच या योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलाआहे.या योजनेच्या एकूण स्थितीवरून जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले की नाही याची स्थिती तपासण्यासाठी शेतकरी मोबाईल नंबरचा वापर करत होते.
परंतु आता तुम्हाला मोबाईल नंबर वरून तुमच्या खात्यात पैसे आले की नाही याची स्थिती पाहता येणार नाही. यासाठी फक्त बँक खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक वैध मानला जाईल.
अगोदर शेतकरी मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून त्यांची स्थिती जाणून घेत होते. प्रत्येकाला आपला स्वतःचा मोबाईल नंबर लक्षात असल्यामुळे त्याची स्टेटस जाणून घेणे सोपे झाले आहे.
नक्की वाचा:मोदींचे २ हजार मिळाले नसतील तर थेट 'या' नंबरवर फोन करून करा चौकशी, लगेच मिळतील पैसे...
का केला गेला हा बदल?
शेतकऱ्यांसाठी वास्तविक पाहता मोबाईल नंबर टाकून आपल्या खात्याची स्थिती पाहणे हे सोपे होते. परंतु मोबाईल वरून स्टेटस तपासण्याची सुविधा सरकारने का बंद केली हा एक मोठा प्रश्न आहे.
यावर कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, मोबाईलनंबर च्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शेतकऱ्यांची स्थिती कळत असे.
त्यामुळे गोपनीय ठेवण्यासाठी हा बदल केला गेला असून आता तुमच्या पी एम किसान स्टेटस फक्त त्यांना तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक माहित आहे तेच तपासू शकतात.
अशाप्रकारे तपासा तुमची स्टेटस
तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे आले की नाही याची स्टेटस तुम्ही तपासू शकतात. ती कशी? हे आपण पाहू.
1- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या https//:pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
2- या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर आहे. यामध्ये तुम्हाला काही पर्याय दिले आहेत.
3- उजव्या लाभार्थी स्थिती अर्थात बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय आहे. त्यावर तुम्ही क्लिक करावे.
4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन परत ओपन होतील. या ऑप्शन पैकी एका मध्ये आधार क्रमांक आणि दुसऱ्या पर्यायांमध्ये बँक खाते क्रमांक लिहिलेला असेल.
Share your comments